आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून चोरी:सुलेरजवळगेत पुन्हा चोरी ; 6 घरे फोडली

अक्कलकोट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुलेरजवळगे येथे ग्रामस्थ पाठलाग करताना चोराचा विहिरीत पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तेथे शनिवारी रात्री वस्तीवरील सहा घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भागूबाई ख्यामगोंडे यांच्या घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून चोरी केली. दक्षिण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भागूबाई ख्यामगोंडे यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडून कपाटातील सोने व चुलत भाऊ अमोघसिद्ध याने आणून दिलेले पैसे चोरीला गेले. कुलूप तोडून ३० हजार रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचा एक सेव्हन पिस सोन्याचा दागिना, आठ हजार रुपये किमतीची अंगठी व २० हजार रोख असा एकूण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. तसेच सुलेरजवळगे येथील मड्डी वस्तीवरील शब्बीर लावणे, व्हनप्पा पुजारी, गोपाळ खुने, कविता वाघमोडे, जयश्री चव्हाण यांच्याही घरी चोरी झाली.चोराच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा दलाचा रात्रभर गावात पहारा होता. शनिवारची चोरी गावाबाहेरच्या वस्तीवर झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...