आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा:अन्...चोरी गेलेले  सौभाग्यचं लेणं 20 वर्षानी मिळाले, कुर्डू गावच्या कमल बाळु गोरे यांना सुखद धक्का

माढा / संदीप शिंदेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नात पतीने घेतलेले सौभाग्याचे लेणं(मंगळसुत्र)चोरट्यांनी घेऊन पोबारा करणे.अन् ते तब्बल २० वर्षानी पोलिसांकडून परत मिळालंय.होय खरे आहे.कुर्डू गावातील कमल बाळु गोरे यांच्या घरातून चोरट्यांनी चोरुन नेलेले मंगळसुत्र माघारी मिळाले आहे.

पाच ग्रॅम सोन्याचा न्याय २० वर्षानी झालाय. आपली सरकारी यंत्रणा कशी काम करते याचे हे उत्तम उदाहरण दुसरं काय. कमल गोरे यांना कुर्डूवाडी पोलिसांनी मंगळसुत्र ताब्यात दिले. मात्र त्यासाठी त्यांना २० वर्ष वाट पहावी लागलीय. आपले मंगळसुत्र मिळण्याची श्वाश्वतीच सोडुन दिलेल्या कमल अन बाळु गोरे यांना मंगळसुत्र हाती पडल्याने दोघे आनंदून गेलेत. मात्र सरकारी काम अन् ६ महिने थांब या म्हणणीचा प्रत्यय आम्हाला चांगलाच मिळाल्याची प्रतिक्रिया देतानाच त्यांनी आनंदाश्रुना मोकळी वाट करुन दिली.

दिव्य मराठी च्या प्रस्तुत प्रतिनिधीने कमलताई च्या प्रत्यक्ष घरी जाऊन हकीकत जाणुन घेतली.
कुर्डू गावच्या हद्दीत वास्तव्यास असलेलं कमल अन् बाळु गोरे हे सामान्य शेतकरी दांम्पत्य. २००१ साली हे दोघेही घरा बाहेर झोपले असताना चोरट्यांनी घरात शिरकाव करीत घरातील पत्र्याची पेटी घेऊन पोबारा केला होता. या घटनेची कमल यांच्या जाऊबाई यमुना गोरे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद देखील दिली होती.पेटीत असलेले साहित्य काढुन घेऊन जात पेटी घराच्या आवारात फेकुन दिली होती.यात कमलताई नी कपड्यात मंगळसुत्र बांधुन ठेवले होते.

घटनेचा छडा कुर्डूवाडी पोलिसांनी लावत चोराना गजाआड ही केलं.त्यांच्याकडून मंगळसुत्र हस्त गत करण्यात आले. ए.एस.आय.भंडारे यांनी प्रकरणाची तपास प्रक्रिया माढा न्यायालयात पार पाडली. तारीख सुनावण्या या न्यायालयिन प्रकियेत मात्र मंगळसुत्र अडकुन राहिलं.चोरीला गेलेले इतर साहित्य जरी मिळाले नसले तरी कमलताईचे मंगळसुत्र मिळालंय. यावरच त्या प्रचंड समाधानी झाल्यात.

कमल गोरे यांना मंगळसुत्र परत देताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे,पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे,महिला पोलिस दुर्गा चौगुले,मेघा आगवणे आदी उपस्थित होते.,मंगळसुत्र हाती मिळताच त्या (कमलताई) पोलिस प्रशासनाचे आभार देखील मानायला विसरले नाही

आम्ही कुणाचे ही वाईट केले नाही.अन् काळ्या आईची करीत असलेली सेवा.कष्टाचे फळ मिळाले असुन मंगळसुत्र जरी उशीरा मिळाले खरे मात्र माझं सौभाग्याचे लेणं परत मिळाल्याचा फार मोठा आनंद झाला आहे.समाजात अनेक चोरीच्या घटना होतात.त्यात अनेक चोरीचे तपास देखील लागत नाहीत.म्हणुन मला देखील माझे मंगळसुत्र मिळेल याचा विश्वास धरला नव्हता.मात्र ते मिळाल्याने आनंदून गेले आहे- कमल बाळु गोरे,कुर्डू ता.माढा

बातम्या आणखी आहेत...