आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय प्रवेश प्रक्रियेत भोंगळ कारभार:जिल्हा काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा, त्वरित प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेतील भोंगळ कारभार त्वरित थांबवावा. अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला आहे.

कमिटीने म्हटले आहे की, सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 25 कोर्स आहेत. यासाठी शुल्क आकारून ऑनलाईन प्रवेश दिले जातात. परंतु हव्या त्या कोर्ससाठी प्रवेश न मिळाल्यास इतर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. शिवाय भरलेल्या फीची संपूर्ण रक्कम परत दिली जात नाही. यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबद्दल सर्व सामान्यांच्या विश्वासाला तडा जात आहे.

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख व भीम संघर्ष दल प्रमुख गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात संस्थेला निवेदन देण्यात आले. संबंधित विद्यार्थ्याच्या शुल्काची रक्कम परत द्यावी व प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला भोंगळ कारभार त्वरित थांबवा अन्यथा प्राचार्य व त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन आयटीआयचे उप-प्राचार्य उडांनशिव व रजिस्ट्रार यांना देण्यात आले आहे.

सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील असतात. आयटीआय येथे कोर्स करून बाहेर पडलेले विद्यार्थ्यांना त्वरीत रोजगार उपलब्ध होतो यासाठी अनेक गरीब कुटुंबातील मुलं या ठिकाणी प्रवेश घेतात. परंतु औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेताना जो कोर्स संबंधित विद्यार्थ्याला करायचा असतो त्याचे ऑनलाईन मेरीट लावण्यात येते आणि संबंधित विद्यार्थ्याला मेरिटमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्याला दुसरे कोर्स करण्यास सांगण्यात येते, अशी ओरड विद्यार्थ्यांमध्ये आहे. एखाद्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिशियन किंवा मोटर मेकॅनिक व्हायचे असेल परंतु मेरिटमध्ये नाव न आल्याने त्याला सुतार किंवा गवंडीचा कोर्स करा म्हणणे कितपत योग्य आहे? असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...