आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कारखाना बचावचे नारे देत बोरामणीत रास्ता रोको

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बचावासाठी बोरामणी येथील ऊस उत्पादक सोमवारी हैदराबाद महामार्ग रोखून धरला होता. ‘चिमणी बचाव, कारखाना बचाव’ अशा नारा देत बोरामणी विमानतळ झालेच पाहिजे, अशी मागणीही पुढे केली.प्रशासनाकडून सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीविरुध्द सुरू झालेली कारवाई त्वरित थांबवावी, बोरामणीत विमानतळासाठी जमीन संपादित झालेलीच आहे.

त्याचे पुढील काम सुरू करण्यात यावे, अशा मागण्या आंदोलकांनी या वेळी मांडल्या. या रास्ता रोको आंदोलनात बोरामणीसह धोत्री, मुस्ती, तांदूळवाडी, दर्शनाळ, वडजी, काटगाव आदी भागातील शेतकरी सहभागी होते. कारखान्याचे माजी संचालक भगवानराव भोसले, बाजार समितीचे माजी संचालक केदार विभूते, शिवशंकर हुक्केरी, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. राजू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

कारखाना वाचवा : अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर अशा तीन तालुक्यांसह मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून सिद्धेश्वर कारखान्याकडे पाहावे लागेल. त्याला नख लागल्यास शेतकरी उद््ध्वस्त होतील. प्रशासनाच्या कारवाईवर राज्य शासनाने हस्तक्षेप करावा. याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही मत मांडले आहे. विमानसेवेत कारखान्याची चिमणी अडसर नाहीच. मग पाडण्याचा अट्टहास का? असा प्रश्न ऊस दर नियंत्रण समिती सदस्य शिवाजीराव पाटील यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...