आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत कर्जदारांवर कडक कारवाई होणार:दि साेलापूर साेशल बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि साेलापूर साेशल काे-ऑपरेटिव्ह बँकेच्या थकित कर्जदारांविराेधात संचालकांनी कठाेर आणि कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला. बँकेचे अध्यक्ष अ‌ॅड. उमरखाँ बेरिया यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. एकूण प्रगती समाधानकारक असल्याचे सांगितले.

दि सोलापूर सोशल सहकारी बँकेला गत आर्थिक वर्षात 76 लाख 69 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचीही त्यांनी दिली. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा लष्कर येथील एन. आर. बेरिया शैक्षणिक संकुलात झाली. अध्यक्षस्थानी अ‌ॅड. बेरिया हाेते. प्रभारी व्यवस्थापक इर्शाद शेख यांनी सभेच्या पटलावरील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना एकमताने मंजुरी मिळाली.

सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अ‌ॅड. बेरिया यांनी समर्पक उत्तरे दिली. थकबाकीदारां विरुध्द कडक कारवाई करण्याच्या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. संचालक अ‌ॅड. सर्फराज पिरजादे यांनी आभार मानले. या वेळी उपाध्यक्ष अहमद खलिफा, ज्येष्ठ संचालक हाजी मैनोद्दीन जैनुलाबुद्दीन शेख, रजाक नाडेवाले, डॉ. नाजीया मुलाणी, मुबीन बागवान, शंकर गोडलोलु आदी उपस्थित हाेते.

आर्थिक प्रगतीवर

बँकेत ठेवी वाढल्या. भाग भांडवल वाढले. गुंतवणूक, खेळते भांडवलातही समाधानकारक वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे रोखता व तरलता या बाबीही आवश्यक प्रमाणात राखलेल्या आहेत. या एकूण गाेष्टी बँक प्रगतिपथावर असल्याचे सांगतात. - अ‌ॅड. यू. एन. बेरिया, बँकेचे अध्यक्ष

बँकेत थकीत कर्जाचे प्रमाण वाढल्याने अशा थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला होता. त्यावर सभासदांनी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसा ठरावच सभेच्या पुढे आला होता. त्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली होती. यापूर्वीही बँकेच्या मागील सभांमध्ये थकीत कर्जदरांचा प्रश्न आलेला होता. त्यावेळीही सभासदांच्या मागणीप्रमाणे असे ठराव झालेले आहेत. परंतु अद्यापही समाधानकारक वसुली होत नाही, असेही सभासद यावेळी म्हणाले. त्यांचे समाधान करताना बेरिया म्हणाले यावेळी मात्र निश्चित थकीत कर्ज वसुली होईल.

बातम्या आणखी आहेत...