आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ७२ तासांच्या काम बंद आंदोलनाचा बुधवारचा पाहिला दिवस होता. पहिल्या दिवशी सकाळ ते सायंकाळपर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाल्याचे पाच उपविभागीय कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये २२ कॉल आले. महातिरणाने उभी केलेल्या पर्यायी व्यवस्थेने उशिरा का होईना विद्युतपुरवठा सुरळीत केला. परंतु नागरिकांना तेवढा वेळ त्रास सहन करावा लागला.
सायंकाळी संप मिटल्यानंतर सर्व यंत्रणेच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे कामकाज सुरू झाले. बुधवारी सकाळी जुनी मिल कंपाउंड येथील महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी सिटूने या आंदोलनात प्रत्यक्षात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. यावेळी सीटूचे नरसय्या आडम, अॅड. जुनी मिल कपाऊंड येथील वीज कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.एम. एच. शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते. सीटूचे आणि इतर वीज संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुध्द भाषण केले.
आंदोलनामुळे आम्ही काही महावितरण अधिकारी आणि एजन्सीच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभी केली आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही भागात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी व्यवस्थेने तो विद्युतपुरवठा सुरळीत केला. संप मिटला असून सायंकाळपासून पूर्वीप्रमाणे काम सुरू आहे. - संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.