आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वी राज्य नाट्यस्पर्धा:संघर्ष आणि लोककलेचा आविष्कार - फकिरा , नाटक सादरीकरन

सोलापुर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानेगाव येथील बावळे परिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र लोककला संकृती निष्ठापूर्वक जपली आहे. जिवंत ठेवली आहे. यशापयशाचा विचार न करता स्वतःला झोकून दिले आहे. याची दखल शासन आणि समाजाने कर्तव्य म्हणून घेतली पाहिजे. स्वप्निल सपना या नाट्य संस्थेने फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या गाजलेल्या संघर्षात्मक कादंबरीवर आधारलेले नाट्य राज्य नाट्य स्पर्धेत सादर करून रसिकांना एक नजराणा दिला.सपना बावळे यांचे लेखन आणि स्वप्निल बावळे यांचे दिग्दर्शन अन्यायाविरुद्ध झुंजणाऱ्या फकिराचे दर्शन घडवते. या कथेवरील चित्रपट, काव्य, कथा, श्री. म. माटे मास्तर आणि अन्य साहित्य लोकप्रिय ठरले आहे. एम.ए., बी.ए.च्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश होता. ही कथा सर्वश्रुत आहे. निवडक प्रसंगांची गुंफण करून सुमारे ५५ कलावंतांनी आपल्या कलेचा आविष्कार घडवला आहे. अलंकार वरवडकर यांच्या मग्रूर बापू खोत आणि राजू पवार यांच्यातली जीवघेणी झुंज दोन गावांतील सत्ता संघर्ष स्पष्ट करते.न्यायाची बाजू घेत इंग्रज आणि खोल टोळी यांना सडेतोड समज देणारा चनबसवेश्वर सोलापुरे यांचा विष्णुपंत. जत्रेतल्या पालखीतील मानाची खोबऱ्याची वाटी पळवणारा गावासाठी प्राण देणारा राणोजी (वामन बावळे), इंग्रज अधिकारी बाबर खान (श्याम घाम) आणि जॉन (शार्दूल साळुंके) या खेरीज विजय सावंत, भीमराव गंगाधरे, अक्षय नीरसागर, महादेव व अन्य स्त्री पुरुष कलावतांनी आपल्या मगदूराप्रमाणे साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.देवाची पालखी, त्यातले लेझिम पथक, बायकांचे नृत्य पथक, वादकांचा ताफा अन्य गावकऱ्यांचा फौजफाटा गायक, वादक कलावंत, बेलभांडारा हे सारे वास्तवतेचे दर्शन घडवणारे. सारा गाव वेठीला धरणारे इंग्रज, हजेरी देण्यास ठाम नकार देणारा फकिरा, सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारा खोत, अखेर कुटुंबे आणि गावकऱ्यांच्या सुटकेसाठी शरण जाणारा आव्हान पेलून खोताचा काटा काढणारा फकिरा- हे सारे नाट्य ठीकच. खोबऱ्याची वाटी पळवण्याचा प्रसंग आणखी रोमहर्षक व्हायला हवा होता. लोंढे यांचे नेपथ्य उल्लेखनीय नव्हते. कसबे - बावळे यांची प्रकाशयोजना प्रभावी वाटली. सपना बावळे यांचे संगीत लोकसंगीताशी नाते सांगणारे गायक कलावंत बापू वाघमारे यांनी यांचा चांगला सूर लागला.

बातम्या आणखी आहेत...