आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील नोंदणी अडचणी त्याचबरोबर नोंदणी तारीख ही वाढवावी या मागणीसाठी विद्यापीठात कुलगुरू दालनात अभाविपकडून आंदोलन करण्यात आले. मात्र सोमवारी दिवसभर आंदोलन करूनही विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची साधी दखलही घेतली नाही.
उलट या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विद्यापीठातून फौजदार चावडीच्या पोलिसांनी सायंकाळी या विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून समज देऊन सोडून दिले. विद्यापीठाने जाणूनबुजून ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमध्ये काही जाचक अटी टाकलेल्या आहेत जेणेकरून पदवीधरांची नोंदणीच कमी होऊन जाईल. विद्यापीठ प्रशासन पदवीधरांच्या मतदानाच्या मूलभूत हक्कावरच घाला घालत आहे. यापुढे याविषयात परिषद आणखी तीव्र आंदोलन करेल, असे महानगरमंत्री समर्थ दरेकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.