आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षेसाठी विद्यार्थी संघर्ष समितीचा हलगीनाद

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इतर विद्यापीठांनी बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. ही पद्धत सोलापूर विद्यापीठानेही लागू करावी. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत केले आहे.

या निर्णयाच्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा संघर्ष समितीच्या वतीन विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शंखनाद व हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावेळी संघर्ष समितीचे अभिषेक थोरात, संदीप क्षीरसागर, अनिल वासम , शहर विद्यार्थी प्रतिनिधी केशव इंगळे उपस्थित होते.ऑफलाइन परीक्षा घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी स्थानिक व परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल वेळेत मिळणार नाही. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असावी आदी मागण्या निवेदनात आहेत.

बातम्या आणखी आहेत...