आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रह-ताऱ्यांची सफर‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्राट चौकातील रयत शिक्षण संकुल ‎ ‎ परिसरात विविध विद्यार्थ्यांनी दूरदर्शी दुर्बीण आणि ‎ ‎ व्हीआर बॉक्स यांच्या माध्यमातून आकाशातील‎ ग्रह, तारे, चंद्र यांचे अवलोकन केले. चंद्रावरील‎ काळे डाग म्हणजे मोठी विवरे असतात. त्याचेही ‎ ‎ अवलोकन करून माहिती घेतली. याचबरोबर‎ आभासी पद्धतीने ग्रहावर फिरण्याचा आनंद लुटला. ‎ ‎

आकाश, सूर्यमाला, ग्रह, तारे गुरुत्वाकर्षण याबद्दल ‎यावेळी वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष अमित‎ बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. वसुंधरा‎ फाउंडेशनच्या वतीने आकाश निरीक्षण हा उपक्रम ‎ ‎ नुकताच येथे आयोजित करण्यात आला होता.‎ शिक्षक अण्णा दीक्षित ज्येष्ठ शिक्षक वसंत नागणे,‎ संतोष वालवडकर, सुवर्णमाला अधटराव उपस्थित‎ होते. यशस्वितेसाठी महावीर आळंदकर, सुनीता‎ पाटील, अविनाश शिंदे, रोहन खंदारे, विद्या थोरात,‎ सागर संभराम, प्रतीक भडकुंबे, विलास गंजगी यांनी‎ प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...