आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्य‎ सादर:हवामानातील बदल दर्शवणारी‎ प्रतिकृती बनवली विद्यार्थ्यांनी‎ ; राष्ट्रीय विज्ञान‎ दिन साजरा

सोलापूर‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांनी‎ ध्वनीचे प्रवर्तन, ज्वालामुखी,‎ सोलार सिस्टिम, फुप्फुसांचे कार्य व‎ हवामानातील बदल दर्शवणारी‎ प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आली‎ होती. तंत्रज्ञानाचा वापर करून‎ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रतिकृती‎ विशेष लक्षवेधी ठरल्या.‎ त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे‎ महत्त्व पटवून देणारे बालनाट्य‎ सादर केले. खेड येथील विवेकानंद‎ पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान‎ दिन साजरा करण्यात आला.‎ उद्घाटन राष्ट्रीय डाळिंब संशोधन‎ केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एन.व्ही. सिंग‎ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी‎ संगीता सारडा, पायल रॉय हे‎ उपस्थित होते. प्रदर्शनात पहिली ते‎ सहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग‎ घेतला होता. विद्यार्थ्यानी विविध‎ प्रयोगाचे सादरीकरण केले.‎ सूत्रसंचालन मनाली शहा यांनी‎ केले. आभार इंदूकुमार यांनी‎ मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी‎ शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर‎ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...