आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञानला भेट‎ विद्यार्थ्यांनी घेतली करिअरची माहिती‎

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रातील करिअरविषयी‎ मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयातील‎ विद्यार्थ्यांनी लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान‎ महाविद्यालयास भेट देऊन माहिती घेतली. वरमी‎ कंपोस्ट युनिट, सेरिकल्चर युनिट, पोल्ट्री युनिट,‎ पॉली हाऊस, मत्स्यपालन प्रकल्प व आंबा,‎ डाळिंब, स्ट्रॉबेरी, चिक्कू, आदी फळबागांची‎ माहिती घेतली. त्यांना लोकमंगलचे प्राचार्य डॉ.‎ अमोल शिंदे आदी प्राध्यापकांनी सहकार्य केले.‎

११ व १२ वी तील एकूण २५० विद्यार्थी आले होते.‎ प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. डॉ. तथागत वाघमारे, प्रा.‎ अमर कदम , प्रा. सागर महाजन, प्रा. एन. खुने‎ यांनीही माहिती दिली. प्रा. उंबरे पूनम यांनी‎ सूत्रसंचालन केले. प्रा. टी. ई. वाघमारे यांनी‎ आभार मानले. प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड, प्रा.‎ सत्याप्पा जामगुंड, प्रा. दत्तात्रय कोळेकर, प्रा.‎ समाधान शेळके, प्रा. सुलक्षणा तिकटे, प्रा. सीमा‎ दळवे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...