आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पार्कवरील मातीच्या मैदानांचा भाडेविषय अभ्यास करून सादर करा

​​​​​​​सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून पार्क मैदानामागील नियोजित व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो मैदानाच्या भाडे आकारणीसाठी स्टेडियम समितीची बैठक महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सकाळी बोलाविली होती. अनेक सदस्य अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी बैठक तहकूब केली आणि भाडेवाढ ठरवण्यासाठी अभ्यास करून पुढील मीटिंगमध्ये प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केली.उपस्थितांमध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजीमलंग नदाफ, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, मगापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, महापालिका क्रीडाधिकारी एम. के. शहापुरे होते.

मैदानांबरोबरच जीम आणि टेबल टेनिस हॉलसाठी भाडे आकारणी प्रस्ताव महापालिका प्रशासन आणू पाहत आहे. याला क्रीडा संघटनांनी विरोध केला आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. ही मैदाने जिल्हा संघटनेला भाडेतत्त्वावर न देता निःशुल्क द्या आणि ही मैदाने संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तयार करावीत, अशी भूमिका मांडली. निवेदन दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रकाश काटूळे, झुबिन अमेरिया (जलतरण) झेड. एम. पुणेकर (टेबल टेनिस), मरगु जाधव, मदन गायकवाड, संजय मोरे (कबड्डी), सुदेश मालप, अनिल यरगल (व्हॉलीबॉल), आनंद चव्हाण( हँडबॉल), एम. शफी (बास्केटबॉल), प्रिया पवार, सुनील चव्हाण, श्रीरंग बनसोडे (खो खो), किरण चौगुले (फुटबॉल), राजेंद्र माने (बॉल बॅडमिंटन), चंद्रकांत रेंबुर्सू ( क्रिकेट), दशरथ गुरव (ॲथलेटिक्स) आदी जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...