आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:चित्रकलेच्या परीक्षेत ठोकळ; प्रशालेचा शंभर टक्के निकाल

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला संचालनालयाच्या चित्रकला परीक्षेत निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला.ठोकळ प्रशालेतील ७४ विद्यार्थी इंटरमिजिएट तर ५२ विद्यार्थी एलिमेंटरीसाठी बसले होते. इंटरमिजिएट परीक्षेत कुणाल चव्हाण, तेजस्विनी,ननवरे, वैभवी वाघे यांनी ‘अ ‘श्रेणी मिळवली. एकूण ७ विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले.

तसेच एलिमेंटरी परीक्षेत एकूण ८ विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक नागराज रमणशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना निर्मला ठोकळ, ॲड. विपिन ठोकळ, सचिन ठोकळ, भिकाजी गाजरे, शिल्पा ठोकळ, प्राचार्य डी. डी. गाजरे यांनी अभिनंदन केले. सवलतीचे गुण मिळवणारे आणि कला शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन व कलाप्रेमी कला शिक्षक संघटना यांच्या पाठपुराव्यांमुळे यंदा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा एकत्र घेण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...