आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे फडणवीस यांच्यावरील एका वकत्व्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंद फिदा झालेत असे आक्षेपार्ह वक्तव्य सुभाष देशमुख यांनी महिलांविषयी केले आहे.
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना यंदाचा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण, लग्नापर्यंतची काळजी घेतली जात आहे. राज्यातील मुलींची चिंता आता फडणवीस करणार आहेत, असे वक्तव्य केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. यावरुन फडणवीसांची स्तुती करताना सुभाष देशमुख यांनी असे म्हटले आहे.
सुभाष पाटील नेमके काय म्हणाले
सुभाष देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्यालासुद्धा पैसे द्यायचे ठरवले. परत पाचवी-सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये त्याच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील.
मुंबईत महिलांसाठी मॉल
सुभाष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या बचत गटांच्या उत्पादनांना चांगले दिवस येतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.