आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्द्ध या अतिरिक्त विषयाचा समावेश केला आहे.यामुळे होमिओपॅथी शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फारमॅकोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यास क्रम करण्याची गरज भासणार नाही. तरी अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या या विषयाबद्दल आयोगाने विविध तज्ञ व्यक्ती, नागरिकांनांकडून सुचना व हरकती मागवल्या आहेत. हरकती पाठवण्यासाठी 8 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. तरी heb.nch@gmail.com यावर आपल्या हकरती पाठवता येतील.
राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने अधिनियम 2020 चे कलम 55 (2) नुसार हा निर्णय घेतला आहे. होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात हा आधुनिक औषध शास्त्र म्हणजे मॉडर्न फार्माकॉलॉजी या विषयाचा समावेश केलेला आहे. या संदर्भात नागरिकांना काही सुचना करावयाच्या असतील तर त्यांनी 8 ऑक्टोबरपर्यंत आयोगाच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाने केलेले आहे. या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करावा यासाठी होमिओपॅथीच्या डाॅ.अरुण भस्मे व सहकारी यांनी आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. डॉ. भस्मे यांनी महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता यावी यासाठी सन 2013 साली नागपूर विधान भवनासमोर सलग 13 दिवस अमरण उपोषण करुन तत्कालीन सरकारला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फारमॅकोलॉजी हा विषय महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टरांना करण्यासाठी भाग पाडले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये सदर विधेयक येवून त्यास संमती मिळाली होती. त्याचे कायद्यात रुपांतर होवून सन 2016 पासून हा काेर्स महाराष्ट्रातील एमबीबीएस कॉलेजमध्ये शिकवला जात आहे.
पहिली बॅच 2016 साली उत्तीर्ण
सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजीची पहिली बॅच 2016 साली बाहेर पडली. महाराष्ट्रातील 25 एमबीबीएस महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरु असून त्यामध्ये प्रत्येक वर्षी होमिओपॅथीचे 1 हजार डॉक्टर उत्तीर्ण होतात. आतापर्यंत आठ ते दहा हजार डॉक्टरांना याचा लाभ घेतला आहे. यामध्ये डॉक्टरांना शिक्षणाबरोबर प्रॅक्टिसही करता आली.
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना होणार लाभ
या कोर्सचा फायदा लक्षात घेवून तो अभ्यासाकरता यावा यासाठी होमिओपॅथी आयोगाने अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा यांना महाराष्ट्र कौन्सील ऑफ हेमिओपॅथीचे सदस्यांनी भेटून मॉडर्न फारमॅकोलॉजी कोर्सचे महत्व सांगितले होते. तसेच सदर कोर्स मुळे होमिओपॅथी शास्त्रशुध्द उपचार करणाऱ्या डॉक्टरांना फायदाच होणार असल्याचे सांगितले होते. त्याचाच परिणाम म्हणून मॉडर्न फार्माकालाजी समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. असे डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.