आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न विमानसेवेचा:धावपट्टीची नेमकी लांबी, अडथळे याचा सर्व्हे व नकाशा सादर करा; डीजीसीएचा विमान प्राधिकरणाला आदेश

साेलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या विमानतळावरील धावपट्टीची नेमकी लांबी किती? त्यावरून अपेक्षित असलेल्या विमान उड्डाणाच्या दृष्टीने अडथळे किती व कोणते याची पाहणी करून नकाशासहीत अहवाल सादर करण्याचे आदेश डीजीसीएचे सहसंचालक डी.सी. शर्मा यांनी नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (एएआय) यांना दिले आहेत. सर्व्हेसाठी ४५ ते ६० दिवस लागतील, असे प्राधिकरणाने ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले आहे. तोपर्यंत हा विषय तूर्त तहकूब ठेवत असल्याचे श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नव्याने आश्वासन देताना संपर्क मंत्री व राधाकृष्णा विखे पाटील यांना डीजीसीएच्या आदेशाबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्याअगोदर झालेल्या प्रशासकीय बैठकीतही या मुद्याचा उल्लेख झाला नाही. सिध्देश्वरच्या चिमणीबाबत विचार होताना हा सर्व्हे झालेला आहेच. पण एनटीपीसीच्या चिमणीचा मुद्दा उपस्थित केला गेल्याने पुर्नपाहणीचे डीजीसीएचे आदेश आहेत.

आश्वासनानंतरही चक्री उपोषण चालूच
बेकायदेशीर उभारलेल्या चिमणीला महापालिकेने कलम ४७८ अन्वये नाेटीस बजावली. विनापरवाना बांधकाम पाडण्याचा. त्याचा आणि डीजीसीएच्या सुनावणीचा काय संबंध आहे? महापालिका आयुक्त त्याकडे निर्देश करून दिशाभूल करत आहेत. पालकमंत्र्यांच्या प्रस्तावास डीजीसीए परवानगी देणारच नाही. म्हणून उपाेषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. केतन शहा, निमंत्रक साेलापूर विकास मंच

११ हजार सोलापूरकरांच्या सह्या
शनिवारी ४६७ लाेकांनी सह्या केल्या. १४ दिवसांत ११ हजार २३ लाेकांची नाेंद झाली आहे. शनिवारी स्त्रीराेगतज्ञ डाॅ. मिलिंद पाटील आले हाेते. सही करत म्हणाले, ‘‘ विमानसेवा नसल्याने परगावच्या वैद्यकीय तज्ज्ञांची येथे येण्यासाठी अडचण हाेते.’’

काय आहे आदेशात?
सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला ‘ना हरकत’ देताना हाेटगी रस्ता विमानतळावरील "रनवे ३३' ची लांबी २००९ मीटर इतकी दर्शवते. एनटीपीसीच्या चिमणीला ‘ना हरकत देताना’ त्याच धापट्टीची लांबी १३६५ मीटर असल्याचे नमूद आहे. या पार्श्वभूमीवर धावपट्टीची नेमकी लांबी, विमान प्राधिकरण कुठल्या प्रकारची विमानसेवा देणार, नियमित प्रवासी सेवा की नैमित्तिक? (इन्स्ट्रुमेंट, नाॅनइन्स्ट्रुमेंट). त्यादृष्टीने अडथळे कोणते? याचा विचार प्राधिकरणाच्या पुनर्पाहणीमध्ये होईल.

बातम्या आणखी आहेत...