आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Success To The Efforts Of The Nurses Association, The Government Has Suspended The Contract Recruitment Of Nurses, Paving The Way For 100% Post Recruitment.

परिचारिका संघटनेच्या प्रयत्नांना यश:परिचारिकांच्या कंत्राटी भरतीला शासनाची स्थगिती; 100 टक्के पद भरतीचा मार्ग मोकळा

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संवर्गासह, विविध रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत सुचना दिल्या होत्या. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनी निषेध केला असता परिचारकांची पदे बाह्यस्त्रोताने न भरता कायमस्वरुपी 100 टक्के पद भरती करण्यात यावी. नव्याने मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदनिर्मिती करुनच पुढील प्रक्रिया करावी असे सांगण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती ही करण्यात याव्यात यासह गेल्या 30 ते 40 वर्षात परिचारकांच्या धुलाई भत्ता,गणवेश भत्ता ,आहार भत्ता इत्यादी भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.आदी 12 महत्वाच्या मागण्यांसाठी 23 में ते 1 जून 2022 या काळात राज्यव्यापी बेमुदत आंदोलन व आझाद मैदान मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन केले होते. हे आंदोलन तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल.असे लिखित आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले होते.

संघटनेने या मागण्यांच्या पूर्ततेच्या दृष्टीने, शासनाकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाने, याबाबत पत्राद्वारे संघटनेस कंत्राटी भरतीबाबतचा 13 एप्रिल 2022 चा शासन निर्णय स्थगित करुन, कायमस्वरूपी पद भरतीची प्रकिया चालू असल्याचे कळवले आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक केले आहे.

डॉ. मनिषा शिंदे म्हणाल्या की, परिचारिका ह्या रुग्णसेवेत मोलाचे योगदान देणारा संवर्ग असून ही पदे कंत्राटदाराकडून भरणे, गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेचा दृष्टीने हितावह नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाने बेरोजगार परिचारिका तसेच संबंध परिचारिका संवर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आर्थिक मागण्यांवर ही शासन स्तरावर कार्यवाही चालू असल्याचे सांगितले जाते त्यासाठी मंत्रालयीन मान्यता आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात 8-10 नव्याने मंजूर झालेली शासकिय वैद्यकीय महाविद्यालये कार्यान्वित होण्याच्या प्रक्रियेत आहेत. काही अत्यंत अत्यल्प मनुष्यबळावर चालवली जात आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिचारीका संवर्गावर कामाचा प्रचंड ताण आहे. पदोन्नती व विनंती बदल्यांची रखडल्या आहेत. यासाठी नव्याने मंजुर सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम प्राधान्याने परिचारीका संवर्गातील कर्मचाऱ्यांची 100% पदनिर्मिती, पदोन्नती व पदभरती तात्काळ होणे आवश्यक आहे.

परिचारीकांचा मागण्यासाठी सातत्याने लढा चालू आहे व पदभरती सह इतर मागण्यांबाबत ही संघटना आग्रही आहे. यासाठी राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्यकार्याध्यक्ष अरुण कदम उपाध्यक्ष - भिमराव चक्रे, शाहजाद बाबा खान,हेमलता गजबे, सुकुमार गुडे,अजित वसावे, सदस्य पांडुरंग गव्हाणे, पल्लवी रेणके, दत्ता ऐवले,आशा यादव इत्यादींनी मोलाचे परिश्रम केले.

बातम्या आणखी आहेत...