आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:मार्डीतून माने गटाची अचानक माघार

उत्तर सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्डी ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप माने गटांनी अचानक माघार घेतल्याने तेथील आठ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले. तर नंदुर ग्रामपंचायत निवडणुकीत तीन ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले. तालुक्यातील एकूण बारा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सतरा सदस्य बिनविरोध निवडले गेले. सरपंचपदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी ३११ जण रिंगणात आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. अकोलेकाटी ग्रामपंचायत सदस्यांच्या अकरा जागापैकी चार जागांवर प्रत्येकी एक अर्ज आल्याने या जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडले गेले उर्वरित सात जागांवर निवडणूक होणार आहे.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य मार्डी - श्रीकांत बाळकृष्ण मार्तंडे, वंदना पंडित राजमाने ,भानुदास शिवाजी काळे, आरती अमोल नारायणकर, संजय भगवान इनामदार ,सुनीता प्रभाकर फुलसागर, कमल भानुदास बोराडे ,नागनाथ शंकर भालेराव. अकोलेकाटी - ज्ञानेश्वर मारुती गवळी, प्रज्ञा इरान्ना पवार ,नंदा नवनाथ अष्टुळे, अंबिका प्रकाश मस्के शिवणी- गीतांजली खडसोळे ,भाग्यश्री सुरवसे नंदुर- समशापूर- गणेश रमेश बचुटे, पद्माबाई नामदेव फुळमाळी,अक्सर बाबू नदाफ

मार्डी बिनविरोध करण्याचा प्रयत्न मार्डी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने भाजपचे इंद्रजित पवार, राष्ट्रवादीचे अविनाश मार्तंडे व दिलीप माने गटाचे बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, मनोहर जगताप यांची चर्चा सुरू होती. सरपंच पद हे पवार गटाला तर उपसरपंच पद हे मार्तंडे गटाला आणि दिलीप माने गटाला पाच ग्रामपंचायत सदस्य जागा देण्याबाबत अंतिम बोलणी सुरू होती. यानंतर घडलेल्या घडामोडीमुळे दिलीप माने गटाच्या सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामागे दिलीप माने गटातील अंतर्गत धुसफूस की अन्य काही याबाबत राजकीय चर्चांना उत आला आहे.

सरपंच पद ३१ तर सदस्य पद १५९ जणांची निवडणुकीतून माघार सरपंच निवडणुकीतून ३१ जणांची तर सदस्य निवडणुकीतून १५९ जणांची माघार अकोलेकाटीमधून सरपंच पदासाठी सहा अर्ज, पाकणीत दिलीप माने गटाचे दोन पॅनल, रानमसले येथेही गटामध्ये फूट , कौठाळीत राष्ट्रवादीचे दोन पॅनल. डोणगावत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी. नरोटेवाडी येथे भाजपचा नवीन गट रिंगणात गावडी दारफळ,कारंबा ,शिवणी दुरंगी लढती, नंदुर - समशापुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याचे प्रयत्न झाले असफल, नंदुरमधील तीन जागा बिनविरोध तर उर्वरित तीन जागेवर निवडणूक आणि समशापूरमध्ये तीन ग्रामपंचायत सदस्य जागेसाठी निवडणूक. कवठे येथे दिलीप माने गट, भाजप व राष्ट्रवादीचे स्वतंत्र तीन पॅनल सरपंच पदासाठी गावनिहाय उमेदवार अकोलेकाटी- ६ गावडी दारफळ- २ डोणगाव - ४ कारंबा- ३ कवठे -४ मार्डी -३ कौठाळी -३ नंदुर - समशापूर-३ नरोटेवाडी-४ पाकणी -७ रानमसले- ६ शिवणी -२

बातम्या आणखी आहेत...