आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीचा फटका:अतिवृष्टीचा उसाला फटका 30 साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण

विठ्ठल सुतार | सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मागील वर्षी अतिवृष्टीचाही फटका उसाला बसला आहे. उताऱ्यात घट झाल्याने मागील वर्षीइतक्या उसाचे गाळप करून यंदा साखरेच्या उत्पादनात ३.८२ लाख टन घट झाली आहे. राज्यातील २०४ साखर कारखान्यांनी यंदा ९९० लाख टन उसाचे गाळप करून ९८.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्याचा उतारा ९.९५ टक्के मिळाला आहे, मागील वर्षी १०.३० टक्के उतारा मिळाला होता. अद्याप गाळप सुरू असून फक्त ३० कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ३६ साखर कारखान्यांनी २२४.६३ लाख टन उसाचे गाळप केले आहे, त्यातून २५.६५ लाख टन साखर उत्पादित केली आहे, ११.४२ टक्के उतारा मिळाला. सातारा व पुण्यात ३१ कारखान्यांनी २०८ लाख टन ऊस गाळप करून २०.८७ लाख टन साखर उत्पादित केली. ९.९९ टक्के उतारा मिळाला. सोलापूर, उस्मानाबादला ४९ कारखान्यांनी २२३.७७ लाख टन उसाचे गाळप केले असून २० लाख टन साखर उत्पादित केली. ८.९८ टक्के उतारा मिळाला.

अहमदनगर व नाशिकमध्ये २७ साखर कारखान्यांनी १२५.९२ लाख मे.टन ऊस गाळप करून १२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले. ९.५४ टक्के उतारा मिळाला. औरंगाबाद विभागात २५ कारखान्यांनी ९६.४४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ८.९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले. नांदेड विभागातील २९ कारखान्यांनी ९७.९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९.७४ लाख टन साखर उत्पादित केली. अमरावती व नागपूर विभागातील ७ कारखान्यांनी १२.४६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली आहे.

उतारा घटला, उत्पादनही घटले... मागील वर्षी राज्यात ९ लाख ९० हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले होते, त्यातून १०२ लाख मे.टन साखर उत्पादन झाले होते. यंदाही तितकेच गाळप होऊन ९८.२५ लाख मे.टन साखर उत्पादित झाली आहे. कोल्हापूर वगळता सर्वच विभागात साखर उतारा घटला घटला आहे. पुणे व सातारा विभागात ९.९९ उतारा मिळाला आहे, मागील वर्षी १०.४६ टक्के होता. सोलापूर उस्मानाबाद विभागात ९.३१ वरून ८.९४ टक्के, अहमदनगर, नाशिक विभागात थोडीशी वाढ झाली आहे. मागील वर्षी ९.३१ होता, यंदा तो ९.५४ टक्के मिळाला आहे. औरंगाबाद विभागात ९.७३ वरून ९.२३ टक्के, नांदेड विभागात १०.४१ वरून ९.९४ टक्के उतारा मिळाला आहे.

कोल्हापुरात वाढ, सोलापुरात घट... साखर उत्पादनात कोल्हापूर प्रथम, पुणे द्वितीय तर सोलापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक ४९ साखर कारखाने सोलापूर विभागात गाळप करीत होते. मागील वर्षीच्या तुलनेत सोलापूर विभागाचे साखर उत्पादन ११.६८ लाख मेट्रिक टन घटले आहे. मागील हंगामात सोलापूर विभागात ३१.६८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. यंदा २० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात मात्र ५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन वाढले आहे. मागील हंगामात २०.९६ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते, यंदा २५.६५ वर गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...