आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकडे जाहीर:गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन 3 कोटी 80 लाख क्विंटलने घटले

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २१० कारखान्यांतून यंदा १० कोटी ५३ लाख १७ हजार क्विंटल साखरेचे झाले उत्पादन

राज्यातील २१० साखर कारखान्यांतून यंदा १० कोटी ५३ लाख १७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभाग प्रथम, पुणे विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर विभागाने २ कोटी ३० लाख ६९ हजार मे.टन उसाचे गाळप करून सर्वाधिक २ कोटी ६५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

त्याखालोखाल पुणे विभागातील ३२ कारखान्यांनी २ कोटी २६ लाख १० हजार मे.टन उसाचे गाळप करून २ कोटी २९ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३ कोटी ८० लाख क्विंटलने उत्पादन घटले आहे.

सवाधिक गाळप

राज्यात सर्वधिक १८ लाख ४१ हजार मेट्रिक टनाचे गाळप सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठलराव शिंदे कारखान्याने केले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात जरंडेश्वर शुगरने १८ लाख १८ हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी कारखान्याने १८ लाख ०१ हजार मे. टनाचे गाळप केले आहे.

सर्वाधिक २२ लाख ०७ हजार क्विंटल साखर उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी कारखान्याने केलेे आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याने १८ लाख २६ हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १६ लाख ५२ हजार क्विंटलचे साखर उत्पादन केले आहे.

साखर उताऱ्यात कोल्हापूर येथील पंचगंगा कारखान्याचा १२.८६ टक्के, सांगली येथील राजाराम बापू पाटील युनिट ३ कारखान्यांचा १२.८४ तर सांगली येथील ३ राजाराम बापू पाटील सहकारी कारखान्याचा १२.८० टक्के उतारा आहे.

साखर उत्पादनात घट

२०१३-१४ साली राज्यात १५७ साखर कारखान्यांचे गाळप झाले होते, यामध्ये १० वर्षांत ५३ नवीन कारखान्यांची भर पडून ही संख्या २१० वर पोहोचली आहे. या हंगामात १० कोटी ५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांची संख्या वाढली असली तरी साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. २०१८-१९ साली १० कोटी ७२ लाख क्विंटल, २०१९-२० साली दुष्काळामुळे ६.१६ कोटी, २०२०-२१ साली १० कोटी ६२ लाख क्विंटल, तर मागील वर्षी २०२१-२२ साली १३ कोटी ८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामाच्या ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस आणि सूर्यप्रकाश कमी असल्याने साखर उत्पादनात घट झाली आहे, असे म्हटले जाते.

याशिवाय इथेनॉल निर्मितीकडे शेतकरी वळत आहेत. मनासारखा भाव मिळत नसल्याने लागवड घटली किंवा राज्यातील काही भागांत जमिनीचा कस कमी झाला, अशीही कारणे काही शेतकरी तसेच कृषी क्षेत्राच्या अभ्यासकांकडून सांगितली जात आहेत.

विभागनिहाय गाळप, साखर उत्पादन असे
विभाग कारखाने गाळप साखर उत्पादन उतारा

जिल्हाउतारा
कोल्हापूर३६ २.३० कोटी
पुणे३२ २.२६ कोटी
सोलापूर५० २.३१ कोटी
अहमदनगर२८ १.३६ कोटी
छत्रपती संभाजीनगर२६ १.०९ कोटी
नांदेड३० १.०५ कोटी
अमरावती४ ७.८ लाख
नागपूर४ ४.८३ लाख
एकूण२१० १०.५२ कोटी