आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Suicide By Strangulation Of A Married Woman Due To Harassment As A Love Affair Deposit, Case Of Incitement To Suicide By Police | Marathi News

गून्हेवृत्त:प्रेमसंबंध ठेव म्हणून त्रास दिल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मंगळवेढा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमसंबंध ठेव म्हणून एकाने सतत घरी येऊन त्रास दिल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १) सकाळी नऊ ते ९.४० या कालावधीत येथील शांतिनगरात ही घटना घडली. पूजा हणमंत शिंदे (वय ३०, मूळ रा. मेंढापूर, ता. पंढरपूर, सध्या रा. शांतिनगर, मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी धोत्रे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध येथील पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पूजा हिचे पती हनुमंत बबन शिंदे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. ते दोन वर्षांपूर्वी खासगी नोकरी करत होते. तर पत्नी पूजा संजीवनी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सध्या ती घरातच होती. २४ मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास दवाखान्यात कामाला असताना गोपी शिंदे यांनी तुमच्या घरी चोर आल्याचे हनुमंत यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर ते घरी गेल्यावर तेथे त्यांच्या पत्नीसोबत एक अनोळखी इसम बसलेला होता. त्यांनी पत्नीस रागावून त्या मुलाचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव धोत्रे, रा. पंढरपूर असे सांगितले. तेव्हा हनुमंत यांनी पत्नीस शिवीगाळ व मारहाण केली होती. तसेच अब्रुला घाबरून समाजात बदनामी नको म्हणून पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यानंतर सातत्याने ती व्यक्ती घरासमोर जात असताना दिसत होती.

हनुमंत यांनी याविषयी पत्नीला विचारल्यावर तिने ज्या दिवशी रंगेहाथ सापडलो तेव्हापासून त्याच्याशी संबंध तोडल्याचे सांगितले होते. परंतु तो नेहमी घराकडे येऊन त्रास देतो, असे पूजाने अनेकदा त्यांना सांगितले होते. तसेच आत्महत्या करेन, असेही तिने सांगितले होते. शुक्रवारी घरी कोणी नव्हते तेव्हा पूजाने घरातील झोपण्याच्या खोलीतील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...