आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक खच्चीकरण करुन आत्महत्येस प्रवृत्त केले:डॉ. मुन्शींच्या मृत्यूला जबाबदार पत्नीसह 5 जणांविरुध्द गुन्हा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डॉ. असद मुंशी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या आत्महेत्यला जबाबदार असणाऱ्या पत्नीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद शाहनवाज मुन्शी(वय 37, कर्णिक नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला.

डॉ. मुंशी यांनी स्वतःला इंजेक्शन देऊन आपली जीवन यात्रा संपवली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहिल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. असद मुंशी यांची पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, सरफराज नजीरअहमद सय्यद, नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद, (सर्व रा. मोहिते नगर, शगुन अपार्टमेंट होटगी रोड सोलापूर) व डॉ. मिलिंद सरोदे (रा. जळगाव) यांचा समावेश आहे.

मानसिक खच्चीकरणाचा आरोप

फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वांनी संगणमत करून फिर्यादीचे भाऊ मयत डॉ. असद मुंशी यांना मानसिक त्रास दिला. तसेच मुंशी हे त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुलीला पाहू न दिल्याने डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास झाला. ते आत्महत्येस प्रवृत्त व्हावे यासाठी त्यांना वारंवार मानसिक त्रास देण्यात आला. तसेच डॉ. मिलिंद सरोदे यांनी देखील फिर्यादी यांचा भाऊ असद मुंशी यांना फोनवर फलकनाज हिच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत. असे बोलून मानसिक खच्चीकरण केले होते.

अखेर उचलले टोकाचे पाऊल

या सर्व त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचा भाऊ असद मुन्शी यांनी 3 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःचा जीव दिला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...