आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:दारूच्या नशेत सासुरवाडीत जावयाने घेतला गळफास

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामती कोरवली (ता. मोहोळ) येथे जावयाने सासुरवाडी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महेश सुरेश केदार (३५) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद कामती पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सुरेश केदार (रा. डोणज ता. मंगळवेढा) यांचे प्रियंका विजयकुमार दसाडे (रा. कोरवली, ता. मोहोळ) यांच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर ते दोघे सोलापूर येथे राहत होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात महेशचा अपघात झाला होता. अपघातानंतर तो कोणताही कामधंदा करीत नव्हता, त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे तो सतत दारूच्या नशेत असायचा. दारू न पिण्याबद्दल घरच्यांनी व नातेवाइकांनी त्याला खूप समजावून सांगितले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर पत्नी प्रियंका ही एक वर्षापासून माहेरी कोरवली येथे राहत होती.

ता. १८ मार्च रोजी मृत महेश केदार पत्नीला भेटण्यासाठी कोरवलीला आला. दरम्यान, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास शंकर दसाडे यांच्या शेतात दारूच्या नशेत त्याने चिंचेच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सासरे विजयकुमार दसाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कामती पोलिस ठाण्यास माहिती दिली. कामती प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. महेशच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...