आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तांदुळवाडीत विवाहितेची आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

माढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार घालून पडून बोलून शिवीगाळ दमदाटी मारहाण करून शारीरिक मानसिक छळ केल्याच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील तांदुळवाडी येथील कोमल दामोदर गवळी या २९ वर्षीय विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ३० नोव्हेंबरच्या रात्री ११च्या सुमारास घडली.

विवाहितेचा भाऊ सोमनाथ दत्तात्रय गवळी रा. कासारवाडी तालुका बार्शी यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार दामोदर मारुती गवळी(पती), सुरेखा मारुती गवळी(सासु), मारुती बलभीम गवळी (सासरे) या तिघांवर (रा.तांदुळवाडी ता.माढा) माढा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झालाय. बहिणीचे लग्न झाल्यानंतर मागील तीन वर्षापासून सासरी सतत छळ केला आहे. त्यामुळे बहिणीने कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...