आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:शाळकरी मुलीची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळण्याबागडण्याचे वय. तेही अवघे १४, नववी इयत्ता शिकणारी. अज्ञात कारणाने राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. वैष्णवी वसंत कोकरे (वय १४, रा. भारतमाता नगर, हाेटगी राेड, दत्त मंदिर समाेर) असे त्या मुलीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अभ्यास करण्यास जाते, असे सांगून रुममध्ये गेली. थाेड्या वेळाने छताच्या पंख्याला नाॅयलाॅनच्या दाेरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

शनिवारी रात्रीच्या सुमारासतिला तातडीने उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एमआयडीसी पोलिसांत घटनेची नोंद आहे. वैष्णवीचे वडील हे एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. मंगळवेढा येथील रेड्डेवाडी येथील मूळगाव आहे. रविवारी तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...