आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘योगी, महाराज यांचे स्थान मठात आहे. राजकारणात नाही’, असे उद्गार आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच काढले होते. जणू त्यालाच दुजोरा देत त्यांचे वडील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना उद्देशून रविवारी म्हणाले, “राजकारणापेक्षा धर्मपीठच श्रेष्ठ.” मी त्यांच्यावर कधीच टीका केली नाही. पक्षावर मात्र करतो, संधी मिळेल तिथे करतो. सडकून करतो, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपचे कार्यकर्ते वीरभद्रेश बसवंती यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी झाले. त्यासाठी दोघेही एका मंचावर आले होते. श्री. शिंदे पुढे म्हणाले, “दिल्लीत गेल्यावर संपर्क तुटतो. हो ना स्वामीजी? (खा. स्वामींनी नकारार्थी मान हलवली) स्वामीजी नाही म्हणताहेत.” श्री. शिंदे यांनी हसतच स्वामीजींना अनेक चिमटे काढले. स्वामींचे भाषण त्यांच्या अगोदरच झाल्याने त्यांना उत्तर नाही मिळाले.
लोकसेवा आयोगाची परीक्षा६ हजार ७५६ जणांनी दिली
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. एकूण ६ हजार ७५६ जणांची उपस्थिती लावली. २ हजार ४२४ जण गैरहजर होते. येथील २५ शाळा व महाविद्यालयातील केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थींना सकाळी साडेदहा वाजता केंद्रात प्रवेश दिला गेला. सकाळी ११ ते १२ दरम्यान परीक्षा झाली.
गट क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत उद्योग निरीक्षक, कर सहायक दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आदी पदासाठी एकूण ९०० जागांसाठी रविवारी राज्यात विविध जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ९ हजार १८० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २ हजार ४२४ जणांनी दांडी मारली. केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी साडेनऊची वेळ दिली होती. साडेदहाला आत सोडण्यात आले. पावणे अकराला हातामध्ये उत्तरपत्रिका देण्यात आल्या. प्रत्येक वर्गात २४ या प्रमाणे बैठक व्यवस्था केली होती. तसेच शहरातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला होता. परीक्षा असल्यामुळे सर्वत्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गर्दी होती. आयोगाच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रभारी तहसीलदार अमरदीप वाकडे व केदारनाथ परदेशी यांच्या टीमने स्पर्धा परीक्षेचे नियोजन केले होते. परीक्षेसाठी सात समन्वयक अधिकारी, एक विशेष निरीक्षक, एक भरारी पथकाची नेमणूक केली होती. असा प्रकारे एकूण ७३४ अधिकारी व कर्मचारी परीक्षेसाठी तैनात होते.
मरावे परि कीर्तिरूपे....
जन्माला आलोच आहे तर मरणही अटळ आहे. पण माणूस म्हणून बसवंती यांच्यासारखे काम करावे. ज्याला म्हणतात, ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे.”' जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार
हिशेब द्यावा लागेल....
माणसं जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळच आहे, हे खरे. पण जाताना शिल्लक काय ठेवले..? याचा हिशेब द्यावा लागेल. राजकारण्यांना तर ते चुकणारच नाही.’’ सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
बऱ्यापैकी सोडवला
गट कचा पेपर हा १०० गुणांचा असून, त्यासाठी एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेसाठी असून, ते सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ होता. निगेटिव्ह मार्किंग होते, म्हणजे चार प्रश्नांची उत्तरे चुकले तर एक गुण वजा. बऱ्यापैकी पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. सेल्फ स्टडीवर भर होता.’’ वैभव शेंडगे, परीक्षार्थी, पंढरपूर
वीरभद्रेश बसवंती पुतळा अनावरण सोहळ्यात दोघेही एका मंचावर
स्व. बसवंती यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. या वेळी आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, माजी महापौर महेश कोठे, शोभा बनशेट्टी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते. प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविक केले. मयूर बसवंती यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
बसवंती घराण्याविषयी मान्यवरांनी अनेक आठवणी सांगितल्या. वीरभद्रेश बसवंती यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर स्वत:ला सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांची स्मृती जपण्यासाठी पुतळा बसवण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांना राजकारणातील नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे आमदार ठाकूर म्हणाले. मंचावर खा. जयसिध्देश्वर महास्वामी व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे एकमेकांशी आदराने वागले. हे दोघे लोकसभा निवडणुकीत एकमेकाविरुध्द लढले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.