आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजे तालुकाध्यक्ष आम्हाला डावलले असे म्हणत आहेत, त्यांनी सदस्य नाेंदणी केली नाही. त्यामुळे त्यांना तालुकाध्यक्ष हाेता आले नाही आणि जे निवडलेले तालुकाध्यक्ष आहेत ते काँग्रेस निष्ठावंतच आहेत. ते जनसेवा संघटनेचे नाहीत, अशी दुसरी बाजू जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमाेर मांडली.
श्री. शिंदे यांची सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत शुक्रवारी भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून तालुकाध्यक्ष निवडीवरून सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे.
आढावा देऊन चर्चा
त्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, प्रा. काका कुलकर्णी, नियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी म्हसवड (जि. सातारा) येथे भेट घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कामांचा आढावा देऊन चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी श्री. शिंदे यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली.
आम्ही वरिष्ठांकडे आपले मत मांडले आहे. निवड करताना विश्वासात घेतले नाही, हा विषय वरिष्ठ पातळीवर गेला आहे. वरिष्ठ ठरवतील तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.सुशीलकुमार शिंदे आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली असून, परवाच्या दिवशी नाना पटोले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते योग्य निर्णय घेतील.'' अॅड. नंदकुमार पवार, माजी अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, मंगळवेढा.
गैरसमज दूर करणार
धवलसिंह मोहिते पाटील यांचे काम उत्तम असून, नवीन व जुन्यांचा मेळ घालून आपण एकत्रित काम करावे असा सल्ला दिल्याची, तर जिल्ह्यात माेठा मेळावा घेऊन वाद शमल्याचे दाखवून देऊ, असा शब्द धवलसिंहांनी दिल्याची माहिती हत्तुरे यांनी दिली.काँग्रेसच्या नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.