आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ:कुलगुरूंच्या कारभारावर सुटाची आक्रमक भूमिका, विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून आले

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा विभागातील यंत्रणा विश्लेषक पदावरील व्यक्तीच्या नियुक्तीसाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता नाही, जाहिरात न देता हे पद भरण्यात आले, परीक्षा विभागातील खर्चास कधीही व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली जात नाही. ऑनलाइन परीक्षेचे ई-टेंडर न काढता मर्जीतील लोकांना काम देणे, बिलापेक्षा जास्त रक्कम केवळ सर्व्हर भाडे म्हणुन देणे, तरतूद नसतानाही अग्रीम रक्कम देणे आदी प्रकरण हे गैरव्यवहाराची ठरतात. याबाबतची आक्रमक भूमिका सुटा या प्राध्यापकांच्या संघटनेने घेतल्याने विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून येत आहे. परीक्षेतीत गुणवाढ प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुन्हा पुन्हा सत्यशोधन समिती स्थापन करणे, विद्यापीठ आस्थापनाबाहेरील सदस्यांना विभागीय चौकशी समितीसमोर बोलावणे, बहुतांश निर्णय कुलगुरूंच्या अधिकारात घेणे, नंतर व्यवस्थापन समितीसमोर विषय मंजुरीसाठी ठेवणे अादी प्रकाराबाबत व्यवस्थापन समिती सदस्य विविध प्रकारे विरोध करताना दिसून येत आहेत. यातून हे सदस्य व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस विसंवाद अधिक आक्रमक होताना दिसून येत आहे.परीक्षा मंडळ संचालक डाॅ. गणपूर यांची नियुक्तीही वादात सापडली आहे. यंत्रणा विश्लेषकपदी विद्यापीठाचाच एक विद्यार्थी नियुक्त करण्यात आला. त्याचे वय नियमात बसावे, म्हणून कमी केलेल्या वयानुसार दुसरी जाहिरात देण्यात आली. पहिल्या जाहिरातीनुसार तो अपात्र ठरला असता. दुसऱ्या वेळी पात्र ठरला. मात्र वाद वाढल्यानंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले.

गैरकारभाराचे प्रकरणे
शासन नियुक्त अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, काहीना तात्पुरता कार्यभार देत शासन निर्णय डावलले, अग्रक्रम न पाळणे आदी विविध कामे बेकायदा व मनमानी पद्धतीने केली गेली आहेत. बेकायदा नियुक्त्या व चुकीच्या व्यक्तीला दिलेला तात्पुरता कार्यभार अशी डझनभर प्रकरणे विद्यापीठात घडलेली आहेत. याबाबत सुटा संघटना पाठपुरावा करीत आहे.

नियमानुसारच कामे
बेकायदेशीर कामांना मान्यता मिळावी, यासाठी संघटनेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. खरे तर वस्तुस्थिती पाहिली तर पारदर्शी व नियमानुसार कामांना प्राधान्य हीच विद्यापीठाची कार्यशैली आहे. विद्यार्थीकेंद्रित कार्य करताना त्यांच्या हिताला बाधा पोहोचली जाते, यासाठीच नाहक विरोध करून विद्यापीठाच्या विकासात खीळ घालण्याचा हा प्रकार आहे.
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...