आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव‎:पुस्तक प्रेम, वाचन आवड जपत "सदाफुली''चा सुवर्ण महोत्सव‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियामुळे लोकांचा स्क्रीन टाइम‎ वाढला आणि वाचनासाठीचा वेळ‎ झपाट्याने कमी झाला. हे असे काही होईल‎ याची सामान्य वाचकांना कल्पना नव्हती.‎ माहितीचा स्त्रोत अचानक कोसळण्यास‎ सुरुवात झाली असली तरी सार्वजनिक‎ वाचनालयांनी सामूहिक वाचनाची आवड‎ पहिल्यापासून उचलून धरलेली आहे, तसे‎ पुस्तकवेड्यांनीही वेगवेगळया उपक्रमातून‎ हे पुस्तकप्रेम अबाधित ठेवलेले आहे.‎

सोलापुरातील लीलाताई शिंत्रे यांनी‎ १९७२ साली मिराशी यांच्या घरी सदाफुली‎ ही लायब्ररी सुरू केली. प्रत्येकीने चांगली‎ दर्जेदार दोन पुस्तके विकत आणायची‎ आणि वर्षभर त्या पुस्तकांची देवाणघेवाण‎ करून ती सगळी पुस्तके वाचायची व‎ त्यावर चर्चा करायची असे या उपक्रमाचे‎ स्वरूप होते.

दर महिन्याला पुस्तकांचे‎ आदानप्रदान आणि चर्चा होते.‎ वाचन चळवळ जोपासणाऱ्या या‎ लायब्ररीमध्ये सुरुवातीला २५ महिला‎ होत्या. दरवर्षी नवनवीन पुस्तकांचे वाचन‎ व चर्चा होत गेली. या उपक्रमाला यावर्षी‎ पन्नास वर्षे पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सव‎ सिंगी मळा येथे झाला. यावेळी प्रमुख‎ पाहुणे म्हणून संतोष शिंत्रे, पुणे उपस्थित‎ होते.

त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.‎ सोलापुरातील डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर,‎ डॉ. विद्या देशपांडे, डॉ. क्षमा वळसंगकर व‎ डॉ. सुलेखा आराध्ये यांनाही आमंत्रित‎ केले होते. त्यांच्या काव्य वाचनाचा‎ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.‎ हा कार्यक्रम सोलापुरातील सिंगी मळा येथे‎ झाला. प्रास्ताविक डॉ. सुलेखा आराध्ये‎ यांनी केले. सूत्रसंचालन अंजली नानल तर‎ आभार विद्या झांबरे यांनी मानले. या‎ कार्यक्रमाला डॉ. सुनीता आराध्ये, डॉ.‎ मनीषा आंधळगावकर, सीमा किणीकर,‎ उषा शहा, स्मिता वढावकर, विजया झांबरे,‎ प्रा. डिंगरे, जयश्री पटवर्धन, मीना देशपांडे,‎ वर्षा भावार्थी, स्नेहल सहस्रबुद्धे, कल्पना‎ कस्तुरे, मीना सुभाष, सरिता मोकाशी‎ उपस्थित होते.‎

आमच्या ग्रुपमध्ये ६० ते ७५ वयोगटातील २१ महिला सदस्य‎ आहेत. यातील प्रत्येक मेंबर दोन पुस्तके विकत घेतो. ही‎ पुस्तके पुण्यातून डिस्काऊंटवर मिळवतो. पुस्तके वाचून त्यात‎ काय वाचण्यासारखे होते याबाबत चर्चाही करतो. सर्व सदस्य‎ हे सोलापुरातीलच आहेत. खरे ज्ञान पुस्तक वाचनातून मिळते.‎- विद्या झांबरे, सदाफुली सदस्या‎

माझ्या आईने या उपक्रमास सुरुवात केली.‎ त्यामुळेच लहानपणापासून वाचनाचे संस्कार होत‎ गेले व लेखनाचे, अनुवादाचे खूप मोठे काम करता‎ आले. एखादी छोटी का होईना लायब्ररी पन्नास वर्षे‎ सतत चालू ठेवणे हे खूपच मोठे काम आहे.‎ -मिलिंद शिंत्रे, पुणे‎

बातम्या आणखी आहेत...