आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांच्या आविष्काराला रंगवर्धन देणार मोफत रंगमंच:उपक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्रकाश यलगुलवार यांचे आवाहन

सोलापूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगमंचावर या मोफत नाट्य साहित्य कलाकृती सादर करा आणि मनमुराद आनंद लुटा या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि.6 ऑगस्ट रोजी नाट्य परिषदेच्या मोदी येथील स्व.पद्माकर देव सभागृहात नाट्य परिषदेचे अध्यक्ष,माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली.

या उपक्रमात नाट्य, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील एका कार्यक्रमाचे आयोजन दर शनिवारी करण्यात येणार आहे, यामध्ये नाट्य वाचन, नाट्य- अभिवाचन, नाट्यछटा, एकांकिका सादरीकरण, काव्यवाचन व सांगितिक कार्यक्रम आदि कार्यक्रमांचे आयोजन परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. सोलापुरातील सर्व नाट्य,साहित्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांना आपले सादरीकरण या उपक्रमांतर्गत करावयाचे असल्यास त्यांना या उपक्रमातून संधी दिली जाणार आहे. सोलापुरातील नवोदित नाट्य लेखकांच्या नाट्यकृतींचे वाचन किंवा अभिवाचन करावयाचे असल्यास त्यांनाही या उपक्रमांतर्गत संधी देण्यात येणार आहे. तरी याचा लाभ सोलापुरातील नाट्य, साहित्य,संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी घ्यावा,असेही आवाहन प्रकाश यलगुलवार यांनी यावेळी केले. पहिले पुष्प रत्नाकर मतकरी करंडक' स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त मतकरी लिखित आराधना विश्वस्त मंडळ , सोलापूर, प्रस्तुत ' वारस', लेखन आणि दिग्दर्शन : शिरीष देखणे यांनी केले होते. तर लिओनार्दो आर्ट अकादमी या संस्थेची किरण येलें लिखीत"जीबली" याचे दिग्दर्शन शोभा बोल्ली यांनी केले होते. वरील उपक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी प्रा.जोतिबा काटे- ९५३७५०२७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.