आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे सुयश जाधवचे स्वप्न, पॅरा जलतरण प्रकारात करतोय भारताचे प्रतिनिधित्व

कंदर (गणेश जगताप)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्याने क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकले.

मूळचा करमाळा तालुक्यातील पांगरे येथील सुयश नारायण जाधव हा टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा जलतरणपटू म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात कठोर मेहनत घेत आहे. तो सलग दुसऱ्या वेळेस भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या तीन प्रकारात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो २३ अगस्ट रोजी रवाना होणार आहे. ही स्पर्धा २४ ते ५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णझेप घेणाऱ्या सुयशची वाटचाल देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सुयश सध्या पहाटे सहा ते नऊ सराव, सकाळी ११ ते १२:३० पर्यंत जीम, सायंकाळी पाच ते सात पुन्हा सराव असा दिनक्रम आहे. सुयशने आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १२३ हुन अधिक पदके मिळवली आहेत.

ब्राझील २०१६ ला झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याची पहिल्यांदा निवड झाली होती. यात त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने एकाग्रतेने स्पर्धेवर लक्ष केंद्रित करून सराव चालू ठेवला. तसेच त्याला प्रशिक्षक तपन पानिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत राहिला. याचा फायदा त्याला पुढच्या स्पर्धेत झाला. २०१८ साली झालेल्या एशियन पॅरा स्पर्धेत १ सुवर्ण व २ ब्राँझ पदके मिळवून त्याने उत्तुंग कामगिरी केली. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे कौतुक केले. त्याच्या या सर्व कामगिरीची दखल घेत क्रीडा क्षेत्रात सर्वाकृष्ट समजल्या जाणाऱ्या क्रीडा मंत्रालयाने पॅरा जलतरणपटू या प्रकारात सुयशला अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कारपर्यंत मजल मारणारा सुयश सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

सुयशला घडवण्यात त्याचे वडील नारायण जाधव यांनी मोलाचे कष्ट घेतले आहेत. त्यांनी सुयशला अगदी लहानपणापासून पोहायला शिकवले. तोही उत्तम पोहू लागला. तो बारा वर्षाचा असताना विजेच्या धक्क्याने त्याला दोन्ही हात कोपरापासून गमवावे लागले. तरीही सुयशने खचून न जाता त्याने याच क्षेत्रात भवितव्य घडवण्याचा निर्धार केला.

वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्याने क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकले. वडीलही हे राष्ट्रीय पातळीवर खेळेलेले असल्याने त्याला त्यांचे मार्गदर्शन व घरातूनच बाळकडू मिळाले. त्याच्या अपार कष्टाने व मेहनतीने सुयशने जलतरण या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केले. त्याचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते. विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत गेला. याचदरम्यान त्याने ऑलिम्पिक मध्ये पात्रता फेरीत प्रवेश मिळवला.

तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यमुळे राज्य शासनाच्या मानाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारसह अन्य पुरस्कारही त्याला मिळाले. शासनाने त्याचा कार्याचा गौरव करत वर्ग १ च्या जिल्हा क्रीडा आधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तो सध्या बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे कार्यरत आहे. मला आता सुवर्णपदक दिसत आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावून मी अफाट मेहनत घेत आहे. काहीही झाले तरी देशासाठी दोन सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. ते मी सत्यात उतरविणार. - सुयश नारायण जाधव, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू

बातम्या आणखी आहेत...