आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वेबसाइटद्वारे फसवले स्वामी भक्तांना

अक्कलकोट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अक्कलकोट, जि. सोलापूर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने बाहेरगावच्या भाविकांसाठी आॅनलाइन भक्तनिवास खोल्यांचे बुकिंग केले जात नाही, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यानी केले आहे. ‘देवस्थान अक्कलकोट’ या नावे वेबसाइट तयार करून त्यावर भक्त निवास बुकिंगसाठी 9040239377 या क्रमांकावर पैसे स्वीकारल्याचे प्रकार उघडकिस आल्यानंतर श्री इंगळे यानी वरील आवाहन केले आहे.

गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेशातील मनोकुमार नामक व्यक्तीने बनावट वेबसाइट तयार करून आपण वटवृक्ष देवस्थानचा व्यवस्थापक असल्याचे दर्शवले आहे. त्या वेबसाइटवर 9040239377 या मोबाइल क्रमांकावर भक्तनिवास नोंदणी करतो म्हणून काही भाविकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्या वेबसाइटवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या मैंदर्गी रस्त्यावरील भक्त निवास इमारतीचे छायाचित्र टाकण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावच्या भाविकांना भक्तनिवास बुकिंगसाठी ही ही वेबसाइट देवस्थानची अधिकृत वाटल्याने काही लोकांनी पैसे भरून रूम बुकिंग केली होती.

सायबर तपास करत आहे
स्वामी भक्तांची फसवणूक झाल्याबाबतची तक्रार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने आलेली होती. याबाबत भाविकांचे १४ अर्ज आले होते. ते दाखल करून घेऊन सायबर सुरक्षा यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. -जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...