आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:8 वर्षांपासून बंद स्वामी समर्थ कारखान्याचे धुराडे पेटणार

अक्कलकोटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याचे हित समोर ठेवून आपली मालमत्ता बँकेत गहाण ठेवून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करीत आहेत. त्यांचे कार्य स्वागतार्ह आहे. आपण शासन स्तरावरील मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, या पुढील काळात विधानसभा मतदारसंघात पाटील-कल्याणशेट्टी ही अभेद्य जोडी कायम राहील, सहकार क्षेत्रात आपण कायम अप्पांबरोबर राहणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

रविवारी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार कल्याणशेट्टी व तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नूतन अध्यक्ष व पंचकमिटी, संचालक यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी हे सत्काराला बोलत होते.

अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे होते. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, पक्षनेते महेश हिंडोळे, माजी सभापती महिबूब मुल्ला, संजीवकुमार पाटील, सिध्देश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ कोडते, सुरेश झळकी, माजी जि. प. अध्यक्ष शिवानंद पाटील, अप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, कारखाना संचालक संजीव पाटील, महेश पाटील उपस्थित होेते.

ऊस देऊन सहकार्य करा, जिल्ह्यात जास्त दर देऊ
कारखाना बंद असल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे ते पूर्ण करून डिसेंबरमध्ये कारखाना चालू होईल. उसाला जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा अधिक भाव देऊ, अशी ग्वाही देत पुढील काळात कारखान्याकडून उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा हक्काच्या साखर कारखान्याकरिता ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन सिद्रामप्पा पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...