आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ,‌ दमदाटी; तिघा सावकारांवर गुन्हा

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाच्या उपचारासाठी वीस हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्यापोटी एक लाख रुपये परत दिले तरीही आणखी व्याजाचे पैसे दे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विद्या अशोक माने, उमा अशोक माने (रा. दोघे यतीम खानाजवळ शहानगर, विजापूर रोड) व विद्या माने यांचे मामा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सारिका फुलसिंग गौड (निर्मिती विहार परिहार अपार्टमेंट, विजापूर रोड ) यांनी विजापूर नाका पोलीसात सात जून रोजी फिर्याद देण्यात आली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते १ मार्च २०२२ या कालावधीत घडला आहे. याबाबत माहिती अशी की, ऑगस्ट २०२० मध्ये गौड यांचा मुलगा आजारी पडला होता. त्यांना उपचारासाठी एक लाख रुपये पाहिजे होते. त्यासाठी वीस हजार रुपये विद्या माने यांच्याकडून १० टक्के व्याजाने घेतले होते. त्यासाठी तीन कोरे चेक व स्टॅम्प ही दिले होते. उपचार खर्च आणि कोरोनामुळे त्यांना महिन्याकाठी व्याज देणे जमले नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी घरी असताना तिघेजण घरी आले. पैसे घेतल्यापासून तुम्ही व्याज दिले नाही. आता मुद्दल आणि व्याज द्या नाहीतर मला एकलाख द्या असे म्हणून त्यांच्याशी शिवीगाळ करून मारहाण केली.

तुमच्या मुलावर व भावावर खोटे केस करते. तरच मला पैसे द्याल असे म्हणून निघून गेले. पुन्हा यांच्या मुलाला वारंवार फोन करून तुझ्या आईने घेतले पैसे परत दे म्हणून दमदाटी करत होते. जानेवारी २०२२ मध्ये त्यांना एकलाख रुपये दिले. चेक व स्टॅम्प पेपर मागण्यास गेले असता तुम्ही मला अजून व्याज दिले नाही. चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल करते अशी दमदाटी केली. नोटीस पाठवली, वारंवार व्याजाची मागणी करून दमदाटी, शिवीगाळ केल्यामुळे तक्रार देण्यात आली आहे. फौजदार मुलाणी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...