आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वविक्रम:समुद्रात 36 किमी पोहून कीर्ती करणार विश्वविक्रम

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीर्ती नंदकिशोर भराडिया (वय १६) ही अरबी समुद्रात ३६ किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून पूर्ण करीत विश्व विक्रम प्रस्थापित करणार आहे. ती गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी स. ११ वा. मुंबई येथील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत अंतर सलग आठ ते दहा तास समुद्रात पोहत पूर्ण करणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हा विश्व विक्रम करण्यासाठी कीर्ती मागील सात ते आठ महिन्यांपासून मार्कंडेय जलतरण तलाव येथे ६-७ तास सराव करत आहे. हा विक्रम पूर्ण करण्याकरता कीर्तीला श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उत्तम आहार घेण्याकरिता डॉ. सोनाली घोंगडे यांचे मार्गदर्शन सुरू आहे. तसेच साहस व विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित रहाणार आहेत. तिच्या पूर्ण वेळ पोहण्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

विविध प्रकारच्या परवानग्या घेण्याचे स्विमिंग असोसिएशन व रोटरी क्लब आॅफ सोलापूर यांच्याकडून घेतल्या आहेत. यावेळी मयूर व्यास, झुबीन अमारिया, सुदेश देशमुख, पार्वतय्या श्रीराम, शामसुंदर भराडिया, नंदकिशोर भराडिया, प्रताप सूर्यवंशी, जयेश पटेल आदी उपस्थित होते.

महिनाभर अरबी समुद्रात पोहण्याचा केला सराव
सात ते आठ महिन्यांपासून पोहण्याचा सराव करणाऱ्या कीर्तीने मागील महिनाभर अरबी समुद्रातही पोहण्याचा सराव केला आहे. विक्रम पूर्ण करण्याकरता, पोहताना समुद्रातील खारे व अस्वच्छ पाणी,ऊन, समुद्रातील उलट लाटा, लहान किडे, सायंकाळी अंधार अशा अडचणींवर मात करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...