आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत सहानुभूती, नवे चेहरे अन् बंडखोरीही, पोटनिवडणुकीतून मिळणार नव्या दमाचे नेतृत्व

सोलापूर / मनोज व्हटकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर तालुक्याला यापूर्वी तीन वेळा कै. औदुंबर पाटील (काँग्रेस), पाच वेळा कै. सुधाकरपंत परिचारक आणि तीन वेळा कै. भारत भालके अशा दीर्घकालीन निवडून येणाऱ्या आमदारांची मोठी परंपरा आहे. १९६२ पासून एखाददुसरा अपवाद वगळता या तीन नेत्यांनीच आमदारकी उपभोगली आहे. आता या पोटनिवडणुकीतून तालुक्याला नव्या दमाचे नेतृत्व मिळणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना आघाडीचे भगीरथ भालके यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले जात आहे. त्यांना तालुक्यातूनच मित्रपक्ष शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना भाऊबंदकीतच आव्हान मिळाले आहे. सिद्धेश्वर अवताडे यांची उमेदवारी त्यांची कोंडी करू शकते.

कै. भारत भालके यांनी पहिल्या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरून विधानसभेत पाेहाेचले हाेते. जिल्ह्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर पुढच्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले होते. सुरुवातीला स्वाभिमानी संघटना, रिडालोसच्या मदतीने जिंकले. नंतर काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले. नंतर राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन जिंकले. पण हॅट््ट्रिक केल्यानंतर केवळ दीड वर्षातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भालके यांच्यानंतर आता तालुक्याला मातब्बर असे स्थानिक नेतृत्वच राहिले नाही. या पूर्वी आैदुंबर पाटील, सुधाकरपंत परिचारक यांनी दीर्घकाळासाठी नेतृत्व केले होते. आता या निवडणुकीतून नव्या पिढीच्या नेतृत्वाचा उदय पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होईल. तेथील मतदार आता भगीरथ भालके यांच्या पाठीशी राहतो की समाधान अवताडे यांना निवडतो हेच पाहावे लागेल.

सिद्धेश्वर अवताडे, काळेंमुळे अडचणी वाढल्या : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. समाधान अवताडे यांची अडचण करू शकतात. डीसीसी बँकेवर बरेच वर्षे काम केलेले बबनराव अवताडे यांचे सिद्धेश्वर हे चिरंजीव आहेत. बबनरावांचे मंगळवेढा तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आहे. गेल्या वेळी समाधान अवताडे यांनी या तालुक्यातून चांगली मते मिळवली होती. त्याला या वेळी छेद मिळू शकतो. दुसरीकडे भाजपतच असलेले कल्याणराव काळे हेही साखर कारखानदार असल्याने यांची पंढरपूर तालुक्यात मोठी ताकद आहे. त्यांनीही आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली आहे. तो भाजपला मोठा फटका मानला जातो.

सहानुभूतीच्या लाटेवर भगीरथ भालके
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आता वडिलांचा वारसा चालवण्यासाठी भगीरथ भालके निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव आहे. आता वडिलांच्या निधनानंतर सर्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे. यातून त्यांना सहानुभूतीही आहे. त्यांच्यासमोर मित्रपक्ष शिवसेनेच्या शैला गोडसे यांची उमेदवारी अडचणीची ठरत असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...