आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन्स वन्स डुचकी मेली, ओ रमेश भावजी, हे एक मेलं डुचक, जानराव मग वरपा हौ, है हम अशा वऱ्हाडी मंडळीच्या अनेक वाक्यांनी पोट धरून हसायला लावले. सजला वऱ्हाड निघालय लंडनच्या प्रयोगला तीन हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. श्री साई महिला प्रतिष्ठानच्या महिला महोत्सवाच्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रांगणात पार पडला. यावेळी लक्ष्मण देशपांडे लिखित वऱ्हाड निघालय लंडनला या प्रयोग झाला. अभिनेता संदीप पाठक यांनी सशक्त अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. ए काहून एक प्रसंग सादर करत संदीप पाठक यांनी रसिकांना पुन्हा एकदा वऱ्हाड निघालय लंडनच्या माहोल मध्ये नेले. याप्रसंगी प्रशालेचे संस्थापक प्रा. ए.डी. जोशी, सचिव अमोल जोशी, प्रतिष्ठानच्या सायली जोशी , पोलिस आयुक्त राजेंद्र माने, रूपाली माने, डॉ. वैशाली कडूकर,पोलिस उपायुक्त अजित बोराडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील उपस्थित होते. या महिला महोत्सवात ‘रांगोळी’, ‘मेंदी’, ‘सोलो डान्स’, ‘ग्रुप डान्स’, ‘पाककला’ स्पर्धेत महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
अभिनेता संदीप पाठक यांच्या अभिनयाने मने जिंकली अभिनेते संदीप पाठक यांची मुलाखत आर. जे. बंड्या यांनी घेतली. यावेळी त्यांनी आपला अभिनय प्रवास मांडला. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संस्थेचे सचिव जोशी यांनी इंडियन मॉडेलची नवी इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.