आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या गटाला पराभव केला असून 30 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम ठेवली आहे.
18 पैकी तब्बल 14 जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता कायम असल्याचे दाखवून दिले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश केला असून भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांनी बाजार समिती राखण्यात यश मिळविले आहे.
39 उमेदवार होते रिंगणात
निवडणुकीत 18 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते, तर 1,866 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसची गेली 30 वर्षे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आहे. या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांनी सोसायटी गटातून आव्हान उभे केले होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान परतवत लावत आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या महादेव पाटील यांनी बाजार समिती प्रवेश केला आहे. तर मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला दोन जागा जास्त मिळाल्या आहेत.
सुरेश मारुती बेले हे 42 मते मिळवून विजयी झाले. पाठोपाठ व्यापारी गटाचा निकाल लागला त्यामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम लक्ष्मण माळी हे 125 मते आणि भाजपचे कुमार रामचंद्र शेटे हे 96 मते घेऊन निवडून आले.
ग्रामपंचायत गटाचे निकाल राष्ट्रवादीचे पारड्यात पडले त्यामध्ये सर्वसाधारण गटातून सुनिल भानुदास पाटील (423) अवधूत सुभाष शिंदे (399), अनुसूचित जाती जमाती गटातून राजाराम गुंडा पाखरे (398), आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून धनाजी नारायण पाटील (399) असे चौघे निवडून आले. सोसायटीतून सर्वसाधारण गट संग्राम आबासो पाटील (476), रवींद्र वसंत पाटील (472), दत्तात्रय भिमराव थोरबोले (461), रामचंद्र सत्तू जाधव (460), विठ्ठल रामचंद्र पवार ( 460), अनिल विश्वासराव पाटील (460), बाजार समिती बचाव पॅनल चे महादेव सदाशिव पाटील (442) निवडून आले. सोसायटी महिला राखीव गटातून राष्ट्रवादीच्या विजया शंकर पाटील (480), भाजपच्या रेखा रवींद्र पाटील ( 462), ओबीसी गटातून राष्ट्रवादीचे अंकुश सदाशिव माळी (496), विमुक्त जाती जमाती गटातून मुकुंद सुबराव ठोंबरे (485) विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या तर बाजार समिती बचाव पॅनल चार जागांवर समाधान मानावे. महिला राखीव जागेवर झालेल्या फेर मतमोजणीत 1 मताने रेखा पाटील विजयी घोषित करण्यात आल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.