आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतजमिनीसह, अकृषक जमिनींचा महसूल भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने एका क्लिकद्वारे कर, सारा भरण्याची सोय उपलब्ध होणार असून १ ऑगस्ट महसूल दिनापासून नवीन यंत्रणा नागरिकांसाठी खुली होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बोरुळ (ता. दक्षिण सोलापूर) गावाची निवड झाली आहे.
राज्याच्या महसूल विभागाने ई-चावडी प्रकल्पांतर्गत विविध प्रकाराचे सातबारा, फेरफार, गाव नमुना आठ अ, प्रकारच्या जमिनीच्या खातेउतारांचे संगणकीकरण केले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार बिन शेतीचा दंड, शेतसारा, नजर अंदाजे रक्कम आदी प्रकारचे कर, गाव नमुना क्रमांक १७ प्रमाणे वसूल करण्यात येतात. त्याचे संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावपातळीवरील तलाठी (भाऊसाहेब) हातळणे, समजण्यासाठी सोईस्कर सॉफ्टवेअर तयार केले आहे. ई-चावडी प्रकल्प सर्व गावांमध्ये पोहोचला आहे. त्यात नोंदी करता येणार आहेत. त्याचा पुढील टप्पा शेतसारा वसुलीसाठी प्रायोगिक राज्यभरात राबवण्यात येत आहे. सर्व सहा विभागांमधील निवडक जिल्हे, गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कामकाज सुरू करण्यात येत आहे.
नोंदी करताना येणाऱ्या अडचणी नोंदवून तंत्रज्ञानामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. राज्यभरातून काही निवडक गावांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये झाल्याचे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बोरूळ (दक्षिण सोलापूर) गावचा समावेश आहे. तलाठ्यांनी मागणी नोटीस (डिमांड)द्वारे जमिनीच्या प्रकारानुसार शेतसारा वसूल करता येईल.
संबंधित खातेदाराला तलाठी भाऊसाहेबांकडून मागणी नोटीस पाठविण्यात येईल. ई-चावडी प्रकल्पांमधील नागरिकांची सदनमध्ये ती नोटीस दिसेल. त्यावर संबंधित खातेदाराने क्लिकवरून ती रक्कम ऑनलाइनद्वारे किंवा थेट रक्कम भरता येईल. त्या भरलेल्या कराची पावती देण्यात येईल. सारा (कर) भरल्यानंतर तलाठी जमा झालेला महसूल प्रशासनाकडे जमा करतील.
बोरुळ गावात प्रायोगिक तत्त्वावर सुरू
राज्यभरातून काही निवडक गावांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बोरूळ (दक्षिण सोलापूर) गावचा समावेश आहे. तलाठ्यांनी मागणी नोटीस (डिमांड)द्वारे जमिनीच्या प्रकारानुसार शेतसारा वसूल करता येणार येईल. प्रायोगिक तत्त्वावर एका गावाचा समावेश आहे. तेथील अनुभव, त्रुटींची पूर्तता करून इतर गावामध्ये ती सुविधा सुरू होईल. एक ऑगस्ट महसूल दिनापासून ऑनलाइन यंत्रणा खुली होईल.
शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.