आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवेश्वर विचार मंचतर्फे शिक्षक पुरस्काराचे वितरण:शिक्षक हेच राष्ट्राचे शिल्पकार : आ. देशमुख

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या राष्ट्राची शिक्षण व्यवस्था चांगली ते राष्ट्र भक्कम असते. देशाचा विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो. त्यामुळे राष्ट्र बांधणीमध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. शिक्षक हेच समाज व राष्ट्राचे शिल्पकार होत’ असे प्रतिपादन आ. विजयकुमार देशमुख यांनी केले. बसवेश्वर विचार मंचच्या आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. परमपूज्य विपुलदर्शना महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका, राजाभाऊ गांधी, जितेंद्र बलदोटा, मुख्याध्यापक जितेंद्र पवार, ॲड. आशुतोष पुरवंत, शैलजा पुरवंत आदी उपस्थित होते. यावेळी उपक्रमशील शाळा व शिक्षकांचा शाल, फेटा, मोत्यांची माळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विपुलदर्शनाजी यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले. सूत्रसंचालन रामदास खवेकर यांनी केले तर आभार सचिन मोरे यांनी मानले. यांचा झाला गौरव- प्रा. डॉ. शरद सूर्यवंशी ( सोलापूर विद्यापीठ), प्रा. डॉ. वीरभद्र दंडे ( दयानंद), प्रा. सौ. अपर्णा लकशेट्टी (पुल्ली कन्या प्रशाला), रोहिणी चौधरी ( नू. म. वि. शाळा), श्रुती बागेवाडी ( मेहता प्रशाला), संतोष पाटील (सिद्धेश्वर प्रशाला), संतोष गायकवाड (बालभारती), सरदार नदाफ (दि प्रोग्रेसिव्ह उर्दू), दीपक कन्ना (विद्यानिकेतन), श्याम पाटील (सुरवसे हायस्कूल), वैशाली स्वामी (सिद्धेश्वर बाल मंदिर, ), राजश्री तडकासे (करंजकर विद्यालय)उपक्रमशील शाळा - दयानंद काशिनाथ असावा प्रशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, नीलम नगर, मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे वस्ती,वसंतराव नाईक हायस्कूल, एस. के. मेहता प्रायमरी स्कूल,दहिटणे

बातम्या आणखी आहेत...