आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • A Request From The Teachers' Coordinating Association To The Chief Executive Officer For The Subject Of Sociology To Give Promotion To Those Who Appealed To The Court

न्यायालयात दाद मागितलेल्यांना सोडून पदोन्नती द्या:समाजशास्त्र विषयासाठी शिक्षक समन्वयकांची अधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान विषयाच्या पदोन्नती झाल्या. पण समाजशास्त्र विषय शिक्षकांची शासन आदेशाप्रमाणे वेळीच पदावनती न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळेत शिक्षक जादा झाले तर दुसरीकडे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता गुरुजीच राहिले नाहीत. अनेक शाळेतील गुरुजी पदोन्नतीने दुसऱ्या शाळेवर गेल्याने त्या ठिकाणी चार - चार वर्गाला एकच शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे ग्रामिण भागातील विदयार्थ्यांच्या गुणवत्तेवर पालक वर्गातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती गुरुसेवा परिवाराकडून न्यायालयात दाद मागितलेल्या त्या 54 शिक्षकांना सोडून इतर समाजशास्त्र विषय शिक्षकांची पदावनती व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील व शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना देण्यात आले.

दीड दोन वर्षाच्या कोरोना महामारीनंतर नुकतेच यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरळीतपणे सुरू झाले आहेत असे असले तरी अनेक शाळेत गुरुजी नसल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. याचा शाळेच्या पट- उपस्थिती वर परिणाम होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 8 सप्टेंबर 2022 च्या पत्रांनावे अतिरिक्त ठरलेल्या उपशिक्षकांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करणे बाबत कळवले असले तरी जिल्ह्यातील 54 समाजशास्त्र विषय शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल करून दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी यावर स्थगिती मिळवल्याने ही प्रक्रिया थांबविली गेली आहे. या 54 शिक्षकांना पदावनती नको असली तरी उरलेल्या जिल्ह्यातील 178 शिक्षकांना पदावनती हवी असून उपशिक्षक पदावर काम करण्याची त्यांची तयारी आहे. आंतरजिल्हा बदलीने 150 शिक्षक येणाऱ्यापूर्वी ही प्रक्रिया झाल्यास यांना सोयीच्या शाळा मिळू शकतात. यामुळे 54 साठी 178 जणांची गैरसोय करू नका असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच 30:30:40 या शासन निकषानुसार केंद्रप्रमुखाची पदे हे त्वरित भरण्यात यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. यावेळी अंकुश काळे, मच्छिंद्रनाथ मोरे, बब्रुवान काशीद, वीरभद्र यादवाड, राजाभाऊ राऊत, सूर्यकांत हत्तुरे, राम बिराजदार, अनिरुध्द पवार व शिवाजी पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...