आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:विद्या निकेतन प्रशालेत शिक्षक दिन साजरा

साेलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित विद्यानिकेतन हायस्कूल व हिंगुलांबिका प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बापू ढगे होते. प्रास्ताविक हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक भगवान माने, पर्यवेक्षक गोपीनाथ नवले यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी सहशिक्षक नितीन मुसळे मुख्याध्यापक माने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष बनसोडे यांनी केले तर पर्यवेक्षक गाेपीनाथ नवले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...