आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:परीक्षा परिषदेच्या कारवाईने धास्तावले शिक्षक; जिल्ह्यातील १३९ शिक्षकांच्या नियुक्तीची पडताळणी होणार

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची व्याप्ती वाढत आहे. राज्यातील ७ हजार ८८० शिक्षकांवर पुन्हा टीईटी देण्यावर बंदी घातली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. कारवाईचे आदेशही दिले आहेत. जिल्ह्यातील १३९ शिक्षकांच्या नियुक्तीची पडताळणी होणार आहे.

टीईटी २०१९च्या परीक्षेद्वारे भरती झालेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील बोगस शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. कारण या उमेदवारांच्या नावांची यादीच राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. टीईटी गैरप्रकारात सोलापुरातील शिक्षकांचा सहभाग व कनेक्शन असू शकते, हे ध्यानात घेऊन माहितीची पडताळणी करण्यात येत आहे.

२०१९-२० मध्ये टीईटी झाली होती. या आधारे शिक्षक भरती झाली होती. पुणे सायबर पोलिसांमध्ये या गैरप्रकाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज्यातील जे उमेदवार गैरप्रकाराद्वारे नियुक्त झाले, त्यांच्या प्रस्तावांची पडताळणी होत आहे. जाहीर यादीतील उमेदवारांना आता कधीही टीइटी परीक्षा देता येणार नाही. यांच्या नियुक्त्याही रद्द होणार आहेत. एकूणच टीईटीतील गैरचित्र स्पष्ट होत आहे. सोलापुरातील प्रस्तावांचीही पडताळणी होत आहे. यामुळे अनेक शिक्षक धास्तावले आहेत.

परीक्षा परिषदेकडून तपासणी सुरू
सोलापुरातील प्राथमिक विभागाचे ५३ व माध्यमिक विभागाचे ८६ जणांचे प्रमाणपत्र जमा केले होते. तसेच ४८० पानांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक असल्याची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तवली जात आहे. परीक्षा परिषदेकडून तपासणीे होत आहे.

प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सेवेत असलेल्या व टीईटी उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी राज्य परिषदेकडून सुरू आहे. शैलजा दराडे, आयुक्त राज्य परीक्षा परिषद

बातम्या आणखी आहेत...