आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोदय:सैराटमधील शिक्षकाच्या पीएच.डी. ची तोंडी परीक्षा; नागराज मंजुळे विद्यापीठात

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैराट चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारणारे टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पीएच.डी. करत आहेत. त्यांच्या पीएच.डी.च्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे हे साेमवारी विद्यापीठात आले होते.

यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठास विकास, चित्रपट निर्मिती याविषयावर त्यांनी संवाद झाला. भविष्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी चित्रपट निर्मितीवर कार्यशाळा घेण्याचा, त्यात सहभागी होण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नंतर त्यांनी मास कम्युनिकेशन विभागाला भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी केली. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे, प्रा. साठे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. दत्ता घोलप आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...