आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:आजपासून शिक्षकांची शाळा, बुधवारी विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व माध्यमांच्या शाळा सोमवार, दि. १३ जूनपासून सुरू होतील. ही शाळा फक्त शिक्षकांसाठी असेल. पहिल्या दिवशी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहतील. बुधवार, १५ जूनपासून शाळेच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात हाेईल. त्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करीत मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेशही मिळतील. १३ व १४ जून रोजी शाळेची स्वच्छता, कोविडच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीची तयारी मुख्याध्यापक व शिक्षकांना करावी लागणार आहे.

तसेच शाळास्तरावर रंगरंगोटी, दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. आता शाळा मुलांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. कोविडमुळे शाळा निम्या वर्षापासून सुरू झाल्या. मात्र सध्या कोविडचे प्रमाण कमी असल्याने शाळा ऑफलाइन पध्दतीने भरणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये किलबिलाट ऐकण्यास मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...