आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षकांचा संप, तरीही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण; बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांच्याशी संवाद, दहावीचा 20 तर बारावीचा 10 जूनला निकाल

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावी उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा होतील. सर्व उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर निकाल बनवण्याचे सर्व काम ३५ दिवसांत पूर्ण होईल. अंदाजे दहावीचा निकाल २० जून तर बारावीचा निकाल १० जून लावण्यात येणार असल्याची माहिती, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गोसावी म्हणाले की, कोरोनामुळे मार्च २०२१ मधील परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन केले. राज्याची भौगोलिक परिस्थिती, शाळा व विद्यार्थी संख्या पाहता, बोर्डाचा परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पध्दतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करीत प्रत्येक शाळांवर परीक्षांचे केंद्र तयार केली. राज्यात ३२ हजार परीक्षा केंद्र होती. त्यानुसार परीक्षा सुरळीत झाली, कोणत्याही विद्यार्थ्यांस काहीच त्रास झाला नाही.

मधील परीक्षा झालेल्या नाहीत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन केले. राज्याची भौगोलिक परिस्थिती, शाळा व विद्यार्थी संख्या पाहता, बोर्डाचा परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पध्दतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करीत प्रत्येक शाळांवर परीक्षांचे केंद्र तयार केली. राज्यात ३२ हजार परीक्षा केंद्र होती. त्यानुसार परीक्षा सुरळीत झाली, कोणत्याही विद्यार्थ्यांस काहीच त्रास झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...