आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांविषयी कृतज्ञता:विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा विजय असतो ; शिक्षक दिनानिमित्त गौरव

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. शिक्षकांच्या समाजातील योगदानाची आठवण ठेवून शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामनिर्देश केलेल्या काही शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी वर्षभर विविध गोष्टी राबवण्यावर भर दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचा विजय असल्याचा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाचा शिक्षक दिनानिमित्त गौरव व्हावा हा ‘दिव्य मराठी’कडून प्रयत्न.

राज्यस्तरीय मुलाखती झाल्या
राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाने केलेले सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य, शाळेसाठी समाजाकडून मिळवलेले योगदान, ग्रंथलेखन, प्रशिक्षणात तजज््ञ मार्गदर्शक म्हणून केलेले काम याचाही विचार होतो. पुरस्कारासाठी आवश्यक गोष्टीपेक्षा किती तरी अनेक गोष्टी शाळेमध्ये राबवतो, शिक्षकांनी व इतर मुख्याध्यापक मित्रांनी केलेल्या आग्रहामुळे रस्ताव दाखल केला आहे. मुलाखती घेऊन सोलापूर जिल्ह्यातून तीन शिक्षकांची नावे राज्याकडे पाठवली आहेत. राज्यस्तरीय मुलाखती ऑनलाइन झालेल्या आहेत. जिल्ह्यातील आम्हा तिघांपैकी एका शिक्षकाला शासनाचा पुरस्कार मिळेल.’’
तानाजी माने, मुख्याध्यापक

१०० टक्के उपस्थितीसाठी बक्षीस योजना
विद्यार्थ्यांमध्ये वाचन अभिरुची निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा व ई साहित्यनिर्मिती केली. तंत्रज्ञानाची साथ करू या भूगोलाचा अभ्यास हा ऑनलाइन पद्धतीवर अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम सुरु केला. प्रत्येक महिन्याला उपस्थित विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. तसेच, वर्षाच्या शेवटी मेगा प्राइज पण विद्यार्थ्यांना दिले जाते. यामुळे माझ्या वर्गाची उपस्थिती वाढली आहे. विद्यार्थ्यांना आजारी असताना पण “घरी राहा “असे मला सांगावे लागते. शिक्षकांना मिळणाऱ्या विविध पुरस्कारांमधून त्यांना पुढील कार्याची प्रेरणा मिळते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांतून विद्यार्थ्यांची कृतज्ञता दिसते.’’
पूनम चव्हाण, शिक्षिका

बातम्या आणखी आहेत...