आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची मागणी:अल्पवयीन चुलत बहिणीला पळवून नेऊन युवकाचे लग्न

करमाळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. एका मुलाने फूस लावून चुलत बहिणीस पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला आहे. मुलाने सोशल मीडियात लग्नाचे फोटो टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. यातील मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. २२ फेब्रुवारी रोजी ती घरातून गायब झाली होती. त्यानंतर त्या मुलाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्यावर कारवाईची मागणी मुलीच्या वडिलाने केली आहे. २२ फेब्रुवारी रोजी यातील मुलगी (वय १६ वर्षे ७ महिने) ही येथील एका महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. परंतु ती घरी परतली नाही. त्याच दिवशी यातील संशयित मुलगाही घरी न आल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. तसा संशय आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानंतर शोध घेऊन मुलगी सापडली नाही. त्या मुलाने सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा फोटो ठेवल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

आत्मदहन करण्याचा इशारा : मुलीला पळवून नेलेल्या मुलासह त्यांना मदत केलेल्यांवर कारवाईची मागणी मुलीच्या वडिलाने पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. मुलीस पळवून नेऊन बळजबरीने लग्न केले आहे. तिचा शोध न लागल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...