आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Tehsildar, Deputy Tehsildar Association's Bear Movement, Planted Black Ribbons; Demand To Publish The Service Seniority List Of Deputy Tehsildar Cadre | Marathi News

धरणे आंदोलन:तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे धरणे आंदोलन, लावल्या काळ्या फिती; नायब तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची मागणी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायब तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, तहसीलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेच्या वतीने शुक्रवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. काळ्या फिती लावून आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

नायब तहसीलदार संवर्गातून तहसलीदार संवर्गात पदोन्नती करणे, तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबित सेवा जोड प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तत्काळ निकाली काढणे, महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोयीचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना संघटनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी आपल्या पातळीवरील मागण्या चर्चेतून आणि समन्वयातून सोडवू. आजचे काम बंद आंदोलन मागे घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संघटनेला केल्या. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष सुनील बेलेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत दि. १८ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनात सहअध्यक्ष तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार उपाध्यक्ष नायब तहसीलदार एस. सी. परदेशीमठ, रविकिरण कदम, प्रवीण घम, तहसीलदार अभिजित पाटील, तहसीलदार जयवंत पाटील, स्वप्नील रावडे, बाळासाहेब शिरसट, सुनील शेरखाने, एन. एस. वाकसे, ए. एम. निराळी, मनोज क्षोत्री, व्ही. पी. साळुंखे, संजय निंगूरकर, विजय कवडे, बी. के. बनसोडे, व्ही. एस. लोकरे, आर. आर. कदम, रामकृष्ण पुदाले, डी. एम. गायकवाड, शुभांगी जाधव, आरती दावडे, अभिजित जाधव आदी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...